Urfi Javed च्या ड्रेसचे नाव शीला की जवानी? ऐकून Katrina ही मारेल कपाळावर हात

Urfi Javed ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चर्चेत राहणारी उर्फी आता वेगळ्या कारणामुळेच चर्चेत आली आहे. उर्फीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्या ड्रेसला तिनं चक्क नाव दिलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. 

Updated: Feb 28, 2023, 04:20 PM IST
Urfi Javed च्या ड्रेसचे नाव शीला की जवानी? ऐकून Katrina ही मारेल कपाळावर हात title=

Urfi Javed Dress Name : 'बिग बॉस ओटीटी' फेम उर्फी जावेद (Urfi Javed) ही वादग्रस्त अभिनेत्रींपैकी एक आहे. उर्फी ही अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाते. कोण काय बोलले त्याची उर्फीला चिंता नसते तिला जे करायचं ते बिनधास्तपणे उर्फी करत असते. उर्फी गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत उर्फी चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीतोत उर्फी ही तिच्या हटके स्टाईलमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी उर्फीनं तिच्या ड्रेसला नाव देखील दिले आहे. त्या नावानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. (Urfi Javed Trolled) 

उर्फीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत उर्फीनं हिरव्या रंगाचा क्रॉप टॉप आणि मिनी स्कर्ट परिधान केलं आहे. या व्हिडीओत उर्फीनं जो ड्रेस परिधान केला आहे. या क्रॉप टॉपमधून उर्फीचं क्लीवेज आणि मिडरीफ दिसत आहे. तो पाहून पापाराझी तिला विचारतात की या ड्रेसचं नाव काय आहे. या वर उत्तर देत उर्फी बोलते ड्रेसचं नाव काय असतं या ड्रेसचं नाव शिला की जवानी आहे. उर्फी जावेद पुढे बोलते की सकाळी सहा वाजता जे मिळत ते मी घालून निघते. यावर पापाराझी उर्फीला प्रश्न विचारतात की ती किती वाजता उठते. तर उत्तर देत उर्फी बोलते की मी सकाळी 6 वाजता उठते. (Urfi Javed Dress Name) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : निधनाच्या आदल्या दिवशी स्वप्नात आला आणि... Sidharth Shukla विषयी Asim Riaz चा गौप्यस्फोट

उर्फीला पुढे पापाराझींनी प्रश्न विचारला की ती कंगना रणौतच्या 'लॉकअप' (Kanaga Ranaut Lock Up) या शोमध्ये जाणार आहे का? यावर उत्तर देत उर्फी म्हणाली की नाही मी त्यात जाणार नाही. त्यावर बिग बॉसमध्ये जाणार का? असा सवाल पुढे ते करतात. अशात उर्फी उत्तर देते की मी गेले तर तुमचं घर कसं चालेल. दरम्यान, उर्फीला या व्हिडीओवर कमेंट करत अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, या उर्फी जावेदचे रील व्हिडीओ बंद करा प्लीज. दुसरा नेटकरी म्हणाला, असे सगळे ड्रेस परिधान करण्यासाठी उर्फीला अवॉर्ड मिळाला पाहिजे. तिसरा नेटकरी म्हणाला, असे कपडे परिधान करून उर्फी जातेच कुठे मला कळत नाही. आणखी एक नेटकरी म्हणाला, हिच्याकडे कपडे नाही आहेत. इक नेटकरी म्हणाला, उर्फीनं जे नावं दिलय ते ऐकूण कतरिनाला ही धक्का बसेल..