पहिल्यांदाच समोर आला Urfi Javed चा बॉयफ्रेंड, व्हिडिओमध्ये ऐकमेकांना किस करताना दिसले

टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेदने 'बिग बॉस ओटीटी'च्या घरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. 

Updated: Oct 25, 2021, 10:45 PM IST
पहिल्यांदाच समोर आला Urfi Javed चा बॉयफ्रेंड, व्हिडिओमध्ये ऐकमेकांना किस करताना दिसले

मुंबई : टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेदने 'बिग बॉस ओटीटी'च्या घरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. तिच्या आश्चर्यकारक फॅशन सेन्समुळे तिने घरावर वर्चस्व गाजवलं. शो संपल्यानंतरही उर्फी चर्चेत आहे. उर्फी दररोज तिच्या विविध कपड्यांमध्ये चमकताना दिसते. अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. जो खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांना हसू आवरता नाहीये.

उर्फीला बॉयफ्रेंड भेटला!
उर्फी जावेदने व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिलं आहे की, 'मी तुझ्या प्रेमात आहे... मित्रांनो माझ्या बॉयफ्रेंडला भेटा.' कॅप्शन वाचल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की उर्फीचा बॉयफ्रेंड नक्की आहे तरी कोण, पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण गंम्मत समजेल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

उर्फी कार्टून कॅरेक्टरसोबत मजा करताना दिसली
खरंतर, उर्फी जावेदने Ogre या कार्टुन कॅरेक्टरसोबत एक व्हिडिओ बनवला आहे. हे कॅरेक्टर हिरव्या मॉन्स्टरचं आहे. हा व्हिडिओ Moj अॅपवर बनवण्यात आला असून या अॅपवर Ogre चा फिल्टर आहे. व्हिडिओमध्ये उर्फी या कॅरेक्टरसोबत धमाल करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती खूप मस्ती करत आहे.