'हा' बॉलिवूड अभिनेता एका सुरेख प्रेमकहाणीच्या प्रतिक्षेत

त्याच्या खासगी आयुष्याची चर्चाही कायमच रंगत असते.   

Updated: Jul 31, 2019, 10:33 AM IST
'हा' बॉलिवूड अभिनेता एका सुरेख प्रेमकहाणीच्या प्रतिक्षेत title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : विविध प्रकारच्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारणाऱ्या अमुक एका कलाकाराच्या वाट्याला एका टप्प्यानंतर सारख्याच भूमिका येतात. ही बाब अनेकदा निदर्शनास आली आहे. पण, मुळात आपल्या वाट्याला येणाऱ्या चित्रपटांविषयी याच कलाकारांच्याही काही अपेक्षा आहेत. अशीच अपेक्षा आहे, युद्धपट आणि देशभक्तीपर चित्रपटांमध्ये काम करत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचणाऱ्या एका अभिनेत्याची. 

ही अपेक्षा आहे, एका सुरेख अशा प्रेमकहाणीविषयीची. आपण एका चांगल्या प्रेमकहाणीच्या प्रतिक्षेत असल्याचं म्हणत लक्ष वेधणारा हा अभिनेता आहे, विकी कौशल. 'राझी', 'उरी...' यांसारख्या चित्रपटांतून अफलातून अभिनय़ सादर करणारा विकी प्रेमकहाणीच्या प्रतिक्षेत आहे खरा. पण, तो या गोष्टीची वाट पाहत आहे ते म्हणते रुपेरी पडद्यावरील कारकिर्दीसाठी. 

येत्या काळात विकी कौशल हा 'उधम सिंग बायोपिक'मध्ये झळकणार आहे, त्याशिवाय फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्यात येणाऱ्या चित्रपटातूनही झळकणार आहे. असं असलं तरीही आता आपण वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांच्या प्रतिक्षेत आहे. 

आगामी काळात आपल्याला नेमकं कोणत्या प्रकारच्या चित्रपटात भूमिका साकारायला आवडेल, याविषयी सांगत विकी म्हणाला, 'मला संधी मिळाली तर नक्कीच एकखाद्या रोमँटीक (प्रेमकहाणीवर आधारित) चित्रपटात भूमिका साकारायला आवडेल. प्रत्येक चित्रपटाला प्रेमाची अशी एक वेगळी बाजू असते. पण, त्याचं प्रमाण मात्र मी सांगू शकत नाही. असं असलं तरीही मला असा एखादा चित्रपट साकारायला आवडेल. 

 
 
 
 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

डेक्कन क्रोनिकलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार 'लव्ह पर स्क्वेअर फिट'मध्ये झळकलेल्या अभिनेत्याने पुन्हा एकदा त्याच धाटणीची कलाकृती साकारायला आवडेल, अशी इच्छाही व्यक्त केली. डिजिटल माध्यमांची वाढती लोकप्रियता नेमकी काय आहे, याचे आपण सर्वजण साक्षीदार असल्याचं म्हणत पुन्हा एकदा एखादा चांगला प्रस्ताव आल्यास या माध्यमाकडेही वळण्याची तयारी त्याने दाखवली. पण, सरतेशेवटी चित्रपटविश्व हेच आपलं पहिलं प्रेम असल्याचं विकीने न विसरता स्पष्ट केलं.