'पत्करलेल्या धोक्याची किंमत चुकवावी लागली'

रंगीला, दौर आणि जुदाईसारख्या चित्रपटामध्ये अभिनय करून उर्मिला मातोंडकर ९०च्या दशकातली बॉलीवूडमधली प्रमुख अभिनेत्रींपैकी एक होती.

Updated: Apr 1, 2018, 11:26 PM IST
'पत्करलेल्या धोक्याची किंमत चुकवावी लागली' title=

मुंबई : रंगीला, दौर आणि जुदाईसारख्या चित्रपटामध्ये अभिनय करून उर्मिला मातोंडकर ९०च्या दशकातली बॉलीवूडमधली प्रमुख अभिनेत्रींपैकी एक होती. यानंतर उर्मिलानं कौन, पिंजर आणि सत्या या चित्रपटांमध्ये चरित्र अभिनय केला. पैसे कमवण्यासाठी मी कोणताही चित्रपट केला नाही. माझ्या अभिनयाची क्षमता पाहण्यासाठी मी वेगवेगळ्या चित्रपटांची निवड केल्याचं उर्मिला मातोंडकरनं सांगितलं. पीटीआयला उर्मिलानं मुलाखत दिली आहे.

एक स्टार असणं म्हणजे आपल्याला पाहिजे तशीच भूमिका करण्याची संधी आपल्याला मिळणं, असं उर्मिलाला वाटतं. कलाकार असल्यामुळे आम्ही धोका पत्करतो आणि मी काही आव्हानं स्वीकारली. मी धोके पत्करले आणि याची किंमत मला चुकवावी लागली, अशी कबुली उर्मिलानं दिली. ४४ वर्षांची उर्मिला इरफान खानसोबत ब्लॅकमेल या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये कमबॅक करत आहे.