'नच बलिये ९'साठी 'या' अभिनेत्रीने शो सोडला, एक्ससोबत डान्स प्रॅक्टिसही बंद

'नच बलिये ९' मधील एक्स कपल उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेव यांच्या चर्चा सध्या वाऱ्यासारख्या पसरत आहेत. 

Updated: Jul 25, 2019, 03:06 PM IST
'नच बलिये ९'साठी 'या' अभिनेत्रीने शो सोडला, एक्ससोबत डान्स प्रॅक्टिसही बंद title=

मुंबई : 'नच बलिये ९' मधील एक्स कपल उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेव यांच्या चर्चा सध्या वाऱ्यासारख्या पसरत आहेत. उर्वशीने पहिल्यांदाच त्यांच्या नात्याचा आणि ब्रेकअपचा स्विकार केला आहे. उर्वशीने चक्क 'नच बलिये ९' शोसाठी हातात असलेल्या प्रसिद्ध मालिकेला रामराम ठोकला आहे. 'महाभारत' या प्रसिद्ध मालिकेमध्ये उर्वशी 'द्रोपदी'ची भूमिका साकारत होती. मालिकेच्या दिग्दर्शनाची जबाबदारी पुनीत इस्सर करत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

We are a combination of Serious & Funny Behind the scenes of the music video shoot When @apnanuj gets distracted with my mischievous face he practices separately for Perfectio #nachbaliye9 #musicvideo #shootmode #fun #masti #dance #nach #thestageisset @starplus @banijayasia #urvashidholakia9 #comedancewithus #URUJ #Jodino.3 #gratitude 

 

नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये आपण आता 'महाभारत' मालिकेचा भाग नसल्याचे खुद्द उर्वशीने सांगीतले आहे. ती म्हणाली की, 'हे माझं दुर्भाग्य आहे की, मला आता 'महाभारत' मलिकेमध्ये भूमिका साकारता नाही येणार, कारण 'महाभारत' आणि 'नच बलिये९' या दोघांचे प्रक्षेपण आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये होणार आहे. त्यामुळे मी आणि प्रॉडक्शन हाउसने संगन मताना हा निर्णय घेतला आहे'

दरम्यान, सोशल मी़डियावर तिने तिच्या डान्स प्रॅक्टिसचे व्हिडिओ शेअर केले आहेत. महत्वाचे म्हणजे या व्हिडिओमध्ये ती एकटीच प्रॅक्टिस करताना दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आता 'नच बलिये ९' पुढे कोणते वळण घेणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.