मुंबई : बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या ड्रेसिंग सेन्ससाठी अनेक अभिनेत्र्या चर्चेत असतात. काही अभिनेत्री असे काही ड्रेसिंग करतात की, ज्यामुळे त्यांना काही समस्यांना सामोरं जावं लागतं. अपण अनेकदा असं पाहिलं आहे की, एखादी अभिनेत्री असं काही ड्रेसिंग करते की, ज्यामुळे तिला उठता, बसता, रस्त्यावरुन चालता खूप त्रास होतो, ज्यामुळे ती उप्स मुमेंटचे शिकार होते. सध्या अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेला देखील एका Momentची शिकार झाली आहे.
अभिनयाबरोबरच उर्वशी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. उर्वशी तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर दररोज पोस्ट करत असते. ती काय करते, कुढे जाते? हे सगळं ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना हे दाखवत असते.
चाहत्यांना अभिनेत्रीचा प्रत्येक लूक खूप आवडतो, पण कधीकधी उर्वशीला तिच्या लूकमुळे ट्रोल व्हावे लागते.
सध्या पुन्हा एकदा उर्वशी तिच्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे. ज्याला पाहून तुम्हाला थोडा आश्चर्य वाटेल की, इतक्या मोठ्या व्यक्तीकडून ही छोटी चूक कशी होऊ शकते?
उर्वशी रौतेला नुकतीच जुहूमध्ये दिसली. या दरम्यान, तिचा लूक नेहमीप्रमाणे चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चेत राहिला आहे. तिची हेअरस्टाईल असो की ड्रेसिंग, ती खूपच सुंदर दिसत होती. परंतु यासगळ्यात तिने एक सगळ्यात मोठी चूक केली ती प्राईज टॅगची.
खरेतर उर्वशीने घातलेल्या टॉपवरील प्राईज टॅग काढायला ती विसरली, ज्यामुळे ती आउच मुमेंटला बळी पडली. अभिनेत्रीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून ती जोरदार ट्रोल होऊ लागली. तशी पाहाता ही चूक अगदी सामन्य आहे. आपल्या सारख्या लोकांकडून देखील नकळत या चूका होतात, परंतु ही चूक मोठ्या व्यक्तीकडून होण्याची लोकांना अपेक्षा नव्हती. त्यामुळेच ती इतकी ट्रोल झाली आहे.
उर्वशी रौतेलाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच एका मोठ्या बजेटच्या तमिळ चित्रपटाद्वारे पदार्पण करणार आहे. तिचा चित्रपट हा एक विज्ञान-कल्पित चित्रपट आहे, ज्यामध्ये ती सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि आयआयटीयनची भूमिका साकारणार आहे. यासोबत ती 'ब्लॅक रोझ' या दुहेरी भाषेतील थ्रिलरमध्ये दिसणार आहे. उर्वशी 'थिरुतु पायले 2' च्या हिंदी रिमेकमध्येही काम करत आहे.
या व्यतिरिक्त, उर्वशी जिओ स्टुडिओच्या वेब सीरिज 'इन्स्पेक्टर अविनाश' मध्ये रणदीप हुड्डाच्या प्रमुख भूमिकेत आहे. त्याची वेब मालिका सुपर कॉप अविनाश मिश्रा आणि पूनम मिश्रा यांच्या सत्य कथेवर आधारित बायोपिक आहे.