मुंबई : बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहु लागले आहेत. दीपवीरच्या लग्नाची चर्चा चांगलीच रंगली आहे. त्यातच प्रियंका-नीकचा साखरपुडा पार पडला आणि आता सर्वांना लग्नाची उत्सुकता लागली आहे. दीपवीर, प्रियंका निकनंतर आता अजून एक बॉलिवूड अभिनेता लग्नाळू झाला आहे.
अभिनेता वरुण धवनने लग्नाबद्दल एक खास वक्तव्य केले. एका कार्यक्रमात वरुणला लग्नाबद्दल छेडले असता वरुणने सांगितले की, लग्नाला थोडा वेळ आहे. पण खूप जास्त नाही. तरी थोडा वेळ तर लागेल.
वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी आपल्या रिलेशनशीपबद्दल खुलेपणाने काही सांगितलेले नाही. पण वरुण लवकरच या नात्याला नवे नाव देऊ इच्छित आहे, असे वाटते. नताशा, वरुणची लहानपणापासूनची मैत्रिण आहे. यापूर्वी धवन परिवारासोबत तिचे अनेक फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.