Varun Natasha Romantic Pic : वरुण धवन पत्नी नताशासोबत दिसला रोमँन्टिक अंदाजात; पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन त्याच्या प्रोफेशनल आघाडीमुळे नेहमीच चर्चेत असतो

Updated: Jul 5, 2022, 09:15 PM IST
Varun Natasha Romantic Pic : वरुण धवन पत्नी नताशासोबत दिसला रोमँन्टिक अंदाजात;  पाहा फोटो title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन त्याच्या प्रोफेशनल आघाडीमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याचबरोबर तो सोशल मीडियावरही चाहत्यांशी जोडलेला असतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्याची झलक क्वचितच पाहायला मिळत असली तरी, त्याचा अर्थ असा नाही की त्याचं वैवाहिक जीवन चांगलं नाही. तर तो आपल्या सुंदर पत्नीसोबत खूप आनंदी जीवन जगत आहे. नुकताच या दोघांचा एक न पाहिलेला फोटो व्हायरल होत आहे.

सहसा, जर एखादे कपल सुट्टीवर गेलं तर त्यांचे रोमँटिक फोटो असणं अपरिहार्य आहे. परंतु वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या बाबतीत तसं नाही. दोघांचे रोमँटिक फोटो क्वचितच पाहायला मिळतात.  
व्हायरल होत असलेल्या या कपलच्या फोटोमध्ये वरुण आणि नताशा एकमेकांच्या अगदी जवळ दिसत आहेत. सुट्टीत हे कपल एकमेकांच्या रोमान्समध्ये पूर्णपणे बुडून गेल्याचं दोघांच्या बोलण्यातून स्पष्ट होत आहे. फोटोमध्ये नताशा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये बोल्ड स्टाइलमध्ये दिसत आहे.  दोघांची केमिस्ट्री लोकांच्या पसंतीस उतरली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या कपलच्या लव्ह लाईफप्रमाणेच वैवाहिक आयुष्यही रंजक आहे. असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. लग्नापूर्वी दोघांनीही आपलं वैयक्तिक आयुष्य गुपित ठेवलं होतं. असंच काहीसं लग्नानंतरही पाहायला मिळत आहे.  वरुण आणि नताशाने 24 जानेवारी 2021 रोजी अलिबागमध्ये लग्न केलं होतं. या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर समोर आले होते.