नातवाच्या लग्नात आजोबा धर्मेंद्र यांचा मनसोक्त डान्स, VIDEO व्हायरल

Karan Deol Wedding: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे करण देओलच्या लग्नाची. त्याच्या लग्नातले फोटोज व्हायरल होताना दिसत आहेत. आजोबा धर्मेंद्र यांनी त्यांच्या लाडक्या नातव्याच्या लग्नाच्या वरातीत मनमुराद डान्स केला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 18, 2023, 05:34 PM IST
नातवाच्या लग्नात आजोबा धर्मेंद्र यांचा मनसोक्त डान्स, VIDEO व्हायरल title=
June 18, 2023 | veteran actor dharmendra dances at his grandson wedding video goes viral

Karan Deol Wedding: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे सनी देओलच्या मुलाच्या लग्नाची. करण देओल आणि द्रिशा आचार्य यांचा विवाहसोहळा आज नुकताच संपन्न झाला असून सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो हे सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून करण देओलच्या संगीत सेरेमनीचे फोटो सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहेत. काही दिवसांपुर्वी त्याच्या लग्नातील रोका सेरेमनीचे फोटोही व्हायरल झाले होते. आज 18 जूनला त्याचा लग्नसोहळा संपन्न झाला आहे. करणच्या लग्नातल्या वरातीतले फोटोही सध्या व्हायरल झाले आहेत. त्यामुळे चाहत्यांनीही त्याच्या या फोटोंवर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आता धर्मेंद्र यांनी आपल्या नातवाच्या लग्नातही तूफान डान्स केला आहे. 

आपल्या नातव्याच्या लग्नात मनसोक्तपणे डान्स करायला मिळणं हे आजोबा म्हणून प्रत्येकाचे स्वप्न असते. यावेळी आपल्या नातव्याच्या लग्नातही ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी मनसोक्त डान्स केला. त्यांनी डोक्यावर पगडी बांधली होती आणि कोट घातला होता. यावेळी करणच्या वरातीत ते आले होते. यावेळी त्यांनी फारच उत्साहात डान्स केला आणि मनसोक्त आनंद घेतला. यावेळी त्यांचा मुलगा बॉबी देओलही उपस्थित होता. त्यानंही आपल्या वडिलांसोबत डान्स केला. यावेळी करण देओलच्या लग्नाला संपुर्ण कुटुंबिय हजर होते. बॉबी देओलही परिवारासह आला होता त्याचसोबत अभय देओलही यावेळी उपस्थित होता. त्यामुळे कुटुंबियांच्या उपस्थित करण देओलच्या लग्नाला चार चांद लागले होते. 

यावर्षी जूलैमध्ये धर्मेंद्र यांचा Rocky Aur Rani Ki Prem Kahani हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याची उत्सुकताही प्रेक्षकांना लागून राहिली आहे. धर्मेंद्र हे सोशल मीडियावरही सक्रिय असतात. ते त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. सोबतच काही जुन्या आठवणीही शेअर करताना दिसतात. अशाच आता त्यांच्या या व्हिडीओनं सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे आता सर्वत्र या व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोबत या व्हिडीओखाली चाहते नाना तऱ्हेच्या कमेंट्स करताना दिसत आहेत. सर्वांनाच त्यांचा हा व्हिडीओ आवडला असून हा व्हिडीओ त्यांचे चाहतेही शेअर करताना दिसत आहेत. 

आता धर्मेंद्र यांचा आणि बॉबी व सनी देओल यांचा नवा चित्रपट लवकरच व्हायरल होताना दिसतो आहे. तेव्हा या चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. याआधी ते 'यमला पगला दिवाना 2' या चित्रपटातून दिसले होते. सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपटही 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. तेव्हा या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.