Veteran Actor-Director Rajdutta Comeback: मराठी चित्रपटसृष्टी ही आता जगात आपलं नावं कमावते आहे. त्यामुळे आज मराठी कलाकारांनाही आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होतो आहे. असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी कुठल्याही वयात काम केलं तरी तरी ते एव्हरग्रीन वाटतात. त्याचे उदाहरणं म्हणजे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), त्यांची सगळ्यांनाच प्रेरणा वाटत राहते. त्यामुळे प्रत्येक कलाकाराला त्यांच्यासारखेच बनावेसे वाटते. आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतही दिग्गज मराठी कलाकारांची कमी नाही. अगदी लहान वयापासून ते उतार वयापर्यंत सगळ्यांचीच एनर्जी ही रूपेरी पडद्यावर दिसत असते. त्यातील अशा एका दिग्गज कलाकाराचे नाव घ्यावे लागले आणि ते म्हणजे राजदत्त यांचे. राजदत्त हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक मोठे नावं आहे. त्यामुळे आपल्यालाही त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. (Veteran actors raj dutta comeback from Marathi films at the age of 91)
राजदत्त यांनी वयाच्या 91 व्या वर्षी पदार्पण केले आहे. त्यांनी रंगमंच, चित्रपटांतून काम निभावली आहेत. राजदत्त यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्याचबरोबर त्यांचे 'शापित', 'व्हराडी आणि वांजत्री', 'पुढचं पाऊल', 'मधुचंद्र', 'सर्जा', 'देवकीनंद गोपाळा', 'अरे संसार संसार' अशा की चित्रपटातून कामं केली आहेत. त्यांच्या दिग्दर्शक शैलीचे सर्वांनीच कौतुक केले आहे त्यांचे हे चित्रपट आजही प्रेक्षक आवर्जून पाहतात. त्यामुळे त्यांंची लोकप्रियता ही आजही कायम आहे. अभिनेते दिग्दर्शक राजदत्त (Rajdutta) वयाच्या 91 व्या वर्षी नव्या कोऱ्या मराठी चित्रपटातून काम करत आहेत. त्या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच व्हायरल झाले आहे.
मराठी चित्रपट-मालिका अभिनेता संग्राम समेळ यांने इन्टाग्रामवर याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यानं त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटाचे नावं आहे साथ सोबत. या चित्रपट अभिनेता संग्राम समेळसोबत (Sangram Samel) ज्येष्ठ अभिनेते राजदत्त, अभिनेते मोहन जोशी आणि इतर दिग्गज कलाकार आहेत. सध्या या पोस्टवर अनेकांचे पॉझिटिव्ह कमेंट्स येत आहेत. या चित्रपट 13 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध झाला आहे. या चित्रपटानं सगळ्यांचीच उत्सुकता वाढवली होती.
राजदत्त यांना आत्तापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी केवळ चित्रपटच नाहीत. तर त्यांनी मालिकांचेही दिग्दर्शन केले आहे. त्यातून त्यांनी लघुपट-माहितीपटही (Documentary) दिग्दर्शित केलेले आहेत. ज्यांनाही आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांची 'गोट्या' (Gotya) ही मालिका त्यावेळी प्रचंड गाजली होती. त्यामुळे राजदत्त यांचे मालिका क्षेत्रातही मोठे नावं झाले होते.