Asha Bhosle Married Life : (Indian Film Industry) भारतीय चित्रपटसृष्टीच नव्हे, तर संपूर्ण भारतीय संगीत विश्वात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी अतिशय मोलाचं योगदान दिलं. गानसरस्वती लता मंगेशकर यांची ही धाकटी बहीण. साक्षात सरस्वतीच्या रुपातील बहिणीचं मार्गदर्शन मिळालं आणि आशा भोसले यांनीसुद्धा संगीत क्षेत्रात त्यांची ओळख प्रस्थापित केली. versatile singer अशी ओळख त्यांनी फार कमी वेळात तयार केली. हिंदी चित्रपटांमध्ये कॅब्रे गाण्यांना अतिशय प्रभावीपणे हाताळत आणि सादर करत आशा भोसले यांनी त्यातही महारथ मिळवली. अशा या गायिकेचा आज वाढदिवस. (Asha bhosle birthday)
हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वं म्हणून त्यांनी प्रत्येकाचं मन जिंकलं. प्रत्येक पिढीसोबत त्यांच्यातलंच होत जगण्याचा आनंद घेणाऱ्या (Asha Bhosle ) आशाताई म्हणूनच सर्वांना हव्याहव्याशा वाटतात. पैसा, प्रसिद्धी, यश सर्वकाही त्यांनी अनुभवलं. उतारवयातही या गायिकेला मिळणारं श्रोत्यांचं प्रेम लक्ष वेधणारं.
आशाताईंच्या आयुष्यात आव्हानाचे दिवस आले असं नाही. त्या लहान असतानाच वडिलांचं निधन, त्यानंतरचा काळ हे सारं पाहत आशाताई मोठ्या झाल्या. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी त्यांनी 31 वर्षीय गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केलं. अर्थात या नात्यातून त्या 1960 मध्येच विभक्त झाल्या. पुढे 1980 मध्ये त्यांनी पंचम दा, म्हणजेच राहुल देव बर्मन (R D Burman) यांच्याशी लग्न केलं.
(asha bhosle husband )पहिल्या लग्नातून त्यांना फक्त मनस्तापच मिळाला. गणपतरावांशी असणारं नातं लगेचच वेगळ्या वळणावर आलं. याविषयी एका जुन्या मुलाखतीत त्यांनी म्हटलेलं, 'मला वाटत होतं, की मी फक्त घर आणि मुलंच सांभाळणार. पण, माझं गाणं सोडणं पतीला पटत नव्हतं. त्यांनी जबदरस्तीनं मला गायन सुरु ठेवायला सांगितलं. माझ्यावर हा निर्णय सोडला असता, तर मी केव्हात गाणं सोडलं असतं.'
(Ganpatrao bhosle) गणपतरावांशी आशाताईंचं लग्न झालं, तेव्हा लतादीदींना ही बाब पटली नव्हती. ज्यामुळं त्यांनी अबोला धरला होता. त्यांचा या लग्नाचा स्पष्ट नकार होता. कारण, ते कुटुंब गायिका, कमवत्या सुनेला स्वीकारणाऱ्यांपैकी नव्हतं. या लग्नात फक्त मनस्ताप होता, शेवटी आशा भोसले यांनी गरोदर असतानाच पतीचं घर सोडत आईचं घर गाठलं.
आपल्या आयुष्यात आलेल्या या वळणाविषयी त्यांनी कधीच कोणावरही ठपका ठेवला नाही. पुढे आशाताईंनी गायनावर लक्ष केंद्रीत केलं. ज्यानंतर O.P.Nayyar त्यांच्या आयुष्यात आले. नय्यर यांच्याशी असणारं आशाताईंचं समीकरण त्यांना अमर्याद प्रसिद्धी देऊन गेलं. 1958 ते 1972 दरम्यान, आशा भोसले आणि नय्यन यांचं नातं बहरलं, पण 14 वर्षांनंतर त्यांच्यातही दुरावा आला.
नय्यर यांच्यापासूनच्या नात्यातून त्या सावरल्या आणि जोडीदार म्हणून R D Burman यांची त्यांनी निवड केली. वयाच्या 47 व्या वर्षी आशा भोसले यांनी पंचम दांशी लग्न केलं. सुरुवातीला त्यांना या लग्नासाठी आईचा विरोध होता, पण कालांतरानं तोही मावळला. वैवाहिक जीवनाच्या 14 वर्षांनंतर पंचम यांनी जगाचा निरोप घेतला.
खासगी आयुष्यात आलेले असंख्य चढ-उतार ओलांडत आशा भोसले यांनी जगण्याचा आनंद घेणं सोडलं नाही. म्हणूनच त्या आजही अनेकांच्या प्रेरणास्थानी आहेत.