विकी आणि कतरिना डिसेंबरमध्ये नाही करणार लग्न? अभिनेत्याच्या बहिणीकडून मोठा खुलासा

विकी आणि कतरिना लग्न....   

Updated: Nov 28, 2021, 10:26 AM IST
विकी आणि कतरिना डिसेंबरमध्ये नाही करणार लग्न? अभिनेत्याच्या बहिणीकडून मोठा खुलासा

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफच्या लग्नाबद्दल तुफान चर्चा रंगत आहे. 9 डिसेंबर रोजी विकी आणि कतरिना लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  लग्नाबद्दल रोज नवनवीन माहिती समोर येत आहे.  आता मात्र डिसेंबर महिन्यात दोघे लग्न करणार नसल्याची माहिती समोर येत आहे. यापसंबंधी विकीची बहीण उपासना वेहराने मोठा खुलासा केला आहे. 

दिलेल्या एक मुलाखती दरम्यान, उपासना म्हणाली, 'लग्न ठरल्याच्या बातम्या सर्वत्र वाऱ्यासारख्या पसरत आहेत. लग्न अद्याप ठरलेलं नाही. असं काही असेल तर दोघे जाहीर करतील. बॉलीवूडमध्ये अनेकदा अशा अफवा पसरवल्या जातात आणि नंतर प्रकरण काही वेगळेच असल्याचे समोर येते.'

'नुकतंच माझं भावाशी बोलणं झालं. त्याने मला सांगितलं असं काही नाही. मला आता या विषयावर भाष्य करायचे नाही, सध्या त्याचं लग्न होत नसल्याचं विकीची बहीण उपासनाने सांगितलं आहे. तर दुसरीकडे  एका रिपोर्टनुसार, विकी आणि कतरिना 9 डिसेंबरला राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा रिसॉर्टमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. 

कतरिना कैफच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, लव्हबर्ड्स हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न करतील. 7 व 8 डिसेंबर रोजी संगीत व मेहंदीचा कार्यक्रम होणार आहे. दोघांच्या चाहते त्यांच्या लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. पण विकी आणि कतरिना खरंच लग्न करणार आहेत की नाही हे येणारा काळचं ठरवेल.