विकीचा इन्फ्लुएन्सरसोबत फोटो पाहताच अंकिताचे चाहते संतप्त! म्हणाले, 'तिला ज्याची भीती...'

Vicky Jain trolled : विकी जैनचा सोशल मीडिया इन्फ्लूएंसरसोबतचा तो फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jan 27, 2024, 06:32 PM IST
विकीचा इन्फ्लुएन्सरसोबत फोटो पाहताच अंकिताचे चाहते संतप्त! म्हणाले, 'तिला ज्याची भीती...' title=
(Photo Credit : Social Media)

Vicky Jain trolled : 'बिग बॉस 17'  मधून बाहेर आल्यानंतर विकी जैन त्याच्या पार्टीमुळे चर्चेत आहे. तर अंकिता मात्र, 'बिग बॉस'च्या घरात आहे. तर पत्नी बिग बॉसच्या घरात असताना विकी जैन एकटा काही मैत्रिणींसोबत पार्टी करताना दिसला. सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. त्याच्या पार्टीत ईशा, नसा सईस खान आणि आयशा खान एकत्र दिसले. त्यातलाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात विकी एका मुलीसोबत रोमॅन्टिक पोज देताना दिसतोय. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अंकिताच्या चाहत्यांनी त्यावर कमेंट करत त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

विकीच्या पार्टीतील हे फोटो पूर्वा राणानं शेअर केले आहेत. तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. पूर्वा राणा ही सोशल मीडिया इन्फ्लूएंसर आणि अभिनेत्री आहे. पार्टीतील फोटोत विकी आणि पूर्वा खूप क्लोज उभं राहतं रोमॅन्टिक पोज देत होते. सोशल मीडियावर अंकिताच्या चाहत्यांनी हा फोटो पाहिल्यानंतर त्यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी विकीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोंवर रिअॅक्शन देत नेटकरी संतापले आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की शत्रु मिळाला तरी चालेल पण विकीसारखा नवरा नको भेटायला. दुसरा नेटकरी म्हणाला, अंकिताला ज्या गोष्टीची भीती वाटत होती तेच घडलं. तिसरा नेटकरी म्हणाला, त्याच्या स्वभावानं अंकिताला वेडं बनवलं. आणखी एक नेटकरी म्हणाला, आणि याचा आईला वाटतं माझा मुलगा काही करत नाही. दुसरा नेटकरी म्हणाला, अंकिता इतकी इनसिक्योर का होत होती हे कळलं, कारण तिला माहित होतं की तिचा नवरा ठरकी आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, किती वाईट माणूस आहे हा त्याच्या पत्नीचा देखील आदर करत नाही. ती रडत असेल तरी त्याला काही फरक पडत नाही. आणखी एक नेटकरी म्हणाला, चुकून हा फोटो अंकितापर्यंत पोहोचायला नको. 

पूर्वा राणा संतप्त

विकी जैनसोबतच्या तिच्या फोटोवरून होणारी ट्रोलिंग पाहता पूर्वा राणानं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. पूर्वा राण म्हणाली, 'इतका द्वेश कशाला, मित्रांनो, माझे दोन्ही चांगले मित्र खूप आनंदी आहेत, ते सर्वात मस्त आहेत, ते नेहमी एकत्र असतात. नाटक बघू नका, कारण तुम्हाला काही मिळणार नाही.'