विकी कतरिनाच्या लग्नात 'या' मिठाईनं होणार पाहुण्यांचं तोंड गोड

कतरिना आणि विकी कौशलच्या लग्नाच्या प्रत्येक डिटेल्ससाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

Updated: Dec 7, 2021, 05:10 PM IST
विकी कतरिनाच्या लग्नात 'या' मिठाईनं होणार पाहुण्यांचं तोंड गोड

मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाच्या प्रत्येक डिटेल्ससाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला विकी कतरिनाच्या लग्नाच्या मेनूमध्ये देण्यात येणाऱ्या मिठाईबद्दल सांगणार आहोत. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नात सगळ्या प्रकारची स्वादिष्ट मिठाई दिली जाणार आहे.

सवाई माधोपूरचे सगळ्यात लोकप्रिय मिठाईचं दुकान 'जनता जोधपूर स्वीट होम' ईथेही गेल्या पाच दिवसांपासून सातत्याने सगळ्या प्रकारच्या मिठाईंचा पुरवठा केला जात असून आज आणि परवा लग्नाच्या ऑर्डर्स त्यांना मिळाल्या आहेत. या दुकानाचे मालक कैलाश शर्मा यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना मिठाईच्या नावासह सांगितलंय की, लग्नात त्यांच्याकडून कोणत्या मिठाईची डिलिव्हरी केली जातेय.

कैलाश शर्मा यांनी  त्या सगळ्या मिठाईच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती दिलीये की, काजू पान ड्रायफ्रूट, गुजराती बकवाला, पंचमेवा ड्रायफ्रूट लाडू, ड्रायफ्रूट चॉकलेट बाइट्स (वेगवेगळ्या फ्लेवर्स), अंजरी कतली, मावा कचोरी. दुकानाचे मालक कैलाश वर्मा यांनी डिस्प्लेमध्ये दिसणार्‍या मिठाई व्यतिरिक्त पुरवल्या जाणार्‍या मिठाई आणि खमन ढोकळा, दाल कचोरी, मूग आणि गाजर हलव्याची नावं सांगितली आहेत.

कतरिना आणि विकीच्या लग्नात मिठाई  दिल्याबद्दल मालकाने आनंद व्यक्त केला आणि सांगितलं की, एखाद्या सेलिब्रिटीच्या लग्नात मिठाई देण्याची संधी पहिल्यांदाच मिळाली आहे. जनता जोधपूर स्वीट होमची स्थापना सुमारे 20 वर्षांपूर्वी झाली आणि हे सवाई माधोपूरमधील सगळ्यात मोठं आणि लोकप्रिय मिठाईच्या दुकानांपैकी एक आहे. या परिसरातील सगळ्या मोठ्या पंचतारांकित हॉटेलांनाही येथून मिठाईचा पुरवठा केला जातो.