Viral Video : माधुरी दीक्षितनंतर आता Pakistani Girl च्या व्हायरल डान्सचं Mr. Bean फॅन

Trending Video : 'मेरा दिल ये पुकारे आजा' या गाण्यावरील अनेक रील्स सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. पण पाकिस्तानी तरुणीच्या व्हायरल डान्सनंतर अभिनेत्री माधुरी दीक्षितचं व्हजर्न तुम्ही पाहिलं. पण तुम्ही Mr. Bean चं व्हर्जन पाहिलं का?

Updated: Dec 5, 2022, 10:38 AM IST
Viral Video : माधुरी दीक्षितनंतर आता Pakistani Girl च्या व्हायरल डान्सचं Mr. Bean फॅन title=
Video After Madhuri Dixit now Pakistani Girls viral dance Mr Bean dance Viral on Social media nmp

Pakistani Girl Video : सोशल मीडियाचं जग जेवढं विस्तारलेलं आहे, तेवढंच छोटंही आहे. इथे एखादा फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल झाला तर तुम्ही रातोरात प्रसिद्ध होतात. सध्या पाकिस्तानची तरुणी हिने 'मेरा दिल ये पुकारे आजा' या गाण्यावर डान्स केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि मग काय आज जगभरात ती प्रसिद्ध झाली आहे. तेवढं नाही तर 'मेरा दिल ये पुकारे आजा' या गाण्यावर अनेक रील्स सोशल मीडियावर पाहिला मिळतं आहे. 

नुकतच बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने 'मेरा दिल ये पुकारे आजा' या गाण्यावर पाकिस्तान (Pakistan) तरुणींची नकल केली खरी...पण नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. माधुरी दीक्षित पाठोपाठ प्रसिद्ध Mr. Bean यांचाही डान्सचा (Dance Video Viral) एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतो आहे. 

मिस्टर बीन डान्सचा व्हिडिओ व्हायरल (Mr. Bean dance Viral)

सोशल मीडियावर एखाद्या गोष्टीचा ट्रेंड (trend) आला की त्याचे रील्स आपल्याला पाहिला मिळतात.  लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या 'मेरा दिल ये पुकारे आजा' गाण्यावर अनेक रील्स सोशल मीडियावर आहेत. त्यातील पाकिस्तान मुलीचा व्हिडिओ (Pakistan girl video) हा सर्वात जास्त लोकप्रियक झाला. त्यानंतर आता मिस्टर बीन एक व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 

 

हेसुद्धा वाचा - Girl Video : काय ती अदा, काय ते स्टेप, काय ती स्माईल.., मुलींची अदा पाहून नेटकरी घायाळ

 

'मेरा दिल ये पुकारे आजा' गाण्यावर मिस्टर बीन नाचताना दिसतं आहे. पण हे एका महाशयाने एडिटमध्ये कमाल केली आहे. पण ही कमाल एकदम परफेक्ट बसली आहे. मिस्टर बीनचा हा व्हिडिओ मुळ 'मिस्टर बीन हॉलिडे' या चित्रपटातील आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांना आवडला असून त्यांना हसू आवरतं नाही आहे. 

व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस 

हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर (Instagram)  frk.magazine नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडिओ 20 नोव्हेंबरला शेअर करण्यात आला आहे. तेव्हापासून या व्हिडिओला 5 लाखांपर्यंत लाईक्स मिळाले आहेत. तर कमेंट्सचा पाऊस पडतोय.