रस्त्यावरील मुलीला खाऊ देत जान्हवीने पुढे असं काही केलं की...

एक व्यक्ती म्हणूनही तिने अनेकांचं लक्ष वेधलं.   

Updated: Nov 8, 2019, 02:00 PM IST
रस्त्यावरील मुलीला खाऊ देत जान्हवीने पुढे असं काही केलं की...
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : 'धडक' या चित्रपटातून हिंदी कलाविश्वात पदार्पण केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर हिने अनेकांची मनं जिंकली. एक नवोदित अभिनेत्री म्हणून जान्हवीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य तर गाजवलंच पण, एक व्यक्ती म्हणूनही तिने अनेकांचं लक्ष वेधलं. 

एक सेलिब्रिटी म्हणून वावरत असताना जान्हवी कायमच तिच्यात दडलेल्या माणुसकीचीही झलक कायमच पाहायला मिळते. मग ते कोणाला मदत करणं असो, कोणाला फोटो देणं असो किंवा कारमधून येणार का? असं कोणाला विचारणं असो. सोशल मीडियावर जान्हवीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये खरी जान्हवी आहे तरी कशी हे पाहता येतं. 

सध्याही तिचा असाच एक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. ज्या व्हिडिओमध्ये ती रस्त्यावरील एका लहान मुलीला खाऊ देताना दिसत आहे. मुख्य म्हणजे काही सेलब्रिटींची जनसेवासुद्धा कॅमेरांसमोरच सुरु असते. पण, जान्हवीने मात्र त्या मुलीला भूक लागल्याचं कळताच तिला आपल्यासोबत येण्यास सांगितलं. कारपाशी जात असतानाच आपल्याभोवती असणारा छायाचित्रकारांचा गराडा पाहून तिने त्यांना कॅमेरे बंद करण्याची विनंती केली. 

 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

आपण जे काही करत आहोत ते प्रसिद्धीसाठी नाही, अशीच तिची यामागची भावना असावी. जान्हवीच्या विनंतीनंतर छायाचित्रकारांनीही तिच्या विनंतीचा मान राखत काही क्षणांसाठी कॅमेरा बंद केला. कॅमेरा बंद होताच जान्हवीने त्या मुलीला कारमध्ये ठेवलेलं खाऊचं पॅकेट दिलं, ज्यानंतर त्या मुलीच्याही चेहऱ्यावर आनंद खुलला. 

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनीच जान्हवीच्या या कृतीला दाद  दिली. सध्या चर्चेत असणारी ही अभिनेत्री येत्या काळात 'गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या या भूमिकेकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे.