आलिया भट्टचं फेव्हरेट फूड....

सेलिब्रिटीजच्या आहारात नेमकं काय असतं? 

Updated: Nov 8, 2019, 01:18 PM IST
आलिया भट्टचं फेव्हरेट फूड.... title=

मुंबई : कलाकारांच्या डाएटची सध्या जोरदार चर्चा आहे. कलाकार त्याच्या दररोजच्या जेवणात कोणते खाद्पदार्थांचा सहभाग करतात किंवा कोणत्या गोष्टी टाळतात याकडे आता सगळ्यांचच लक्ष असतं. असं असताना 

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने आपलं आवडतं जेवण सांगितलं आहे. आलियाचं असं म्हणणं आहे की, घरी बनवलेल्या जेवणाची गोष्टच काही निराळी आहे. हे सर्वात स्वादिष्ट असं जेवणं असतं. एवढंच नाही तर आलियाला 'दाल-चावल' म्हणजे 'वरण-भात' अतिशय आवडतो. 

आलिया म्हणते की,'घरचं जेवण अतिशय चांगल आहे. मला आठवडतंय जेव्हा पण माझी आई माझ्यासाठी पास्ता बनवायची तेव्हा मी तिच्याकडे वरण-भाताची मागणी करायचे. मला जेवणात वरण-भात अतिशय आवडतो.' आलियाने कन्फर्ट फूड म्हणजे आपण बाहेर गेल्यावर कुठेही आणि कधीही पदार्थ खावू शकतो यामध्ये 'खिचडी'ची निवड केली आहे. आलियाने 'खिचडी, फ्रेंच फ्राइज आणि वरण-भात'या पदार्थांना सर्वाधिक प्राधान्य दिलं आहे. त्याचप्रमाणे आलियाला फळं देखील आवडतात. 

आलियाला बाहेरचं जेवण खायला आवडत नाही. तिला घरचं जेवण खायला अतिशय आवडतं. आलियाला तिच्या फिटनेसबद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाली की,'माझी दिनक्रमात अनेक गोष्टींचा समावेश असतो. कधी मी पिलेट्स वर्कआऊट (Pilates Work Out)  कधी मी स्विमींग करते तर कधी बॅडमिंटन देखील खेळते. मला असं वाटतं की दररोज शारिरीक सक्रिय असणं गरजेचं आहे.' कितीही व्यस्त शेड्युल असेल तरी हे करणं अत्यंत गरजेचं आहे. 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, आलिया लवकरच रणबीर कपूरसोबत 'ब्रम्हास्त्र' सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा अयान मुखर्जीने दिग्दर्शित केला असून यामध्ये बिग बी देखील लीड रोलमध्ये आहे. हा सिनेमा पुढच्यावर्षी प्रदर्शित होणार आहे.