व्हिडिओ : सई ताम्हणकरचा रहस्यमयी 'राक्षस' येतोय

'जंगल ना गाणं कधी ऐकलंय का?' असा प्रश्न विचारत रहस्यमयी असा 'राक्षस'चा टीझर प्रेक्षकांसमोर आलाय. 

Updated: Jan 18, 2018, 12:36 PM IST
व्हिडिओ : सई ताम्हणकरचा रहस्यमयी 'राक्षस' येतोय title=

मुंबई : 'जंगल ना गाणं कधी ऐकलंय का?' असा प्रश्न विचारत रहस्यमयी असा 'राक्षस'चा टीझर प्रेक्षकांसमोर आलाय. 

अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता शरद केळकर ही जोडी 'राक्षस'च्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र बघायला मिळणार आहे. ऋजुता देशपांडे, दयाशंकर पांड्ये, विजय मौर्य, याकूब सैद, पूर्णानंद वांदेकर यांच्यादेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

या टीजर मधून 'राक्षस' ही आदिवासी, जंगल यांभोवती फिरणारी कथा असल्याचे दिसते. आदिवासी पाड्यावर बालपण व्यतीत गेलेल्या ज्ञानेश झोटिंग यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. घनदाट, किर्रर अशा जंगलात नक्की काय घडलं आहे? आणि या 'राक्षस'मध्ये नेमकं काय रहस्य आहे? हे येत्या २३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना कळणार आहे.