सेटवरुन निघताच तनुश्रीच्या कारवर हल्ला

व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून, नानांची काय प्रतिक्रिया असणार ?

Updated: Oct 1, 2018, 04:47 PM IST
सेटवरुन निघताच तनुश्रीच्या कारवर हल्ला  title=

मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यामध्ये सुरु असणाऱ्या वादाला दर दिवसाआड एक वेगळंच वळण मिळत आहे. सध्याच्या घडीला सोशल मीडियावर या 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तनुश्री नानांसोबत काम करण्यास नकार दिल्यानंतर सेटवरुन निघून जाताना दिसत आहे. 

काही दिवसांपूर्वीच तनुश्रीने नाना पाटेकर यांनी 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. 

या व्हिडिओमध्ये तनुश्री ही कारच्या मागच्या सीटवर बसलेली असून, तिच्यासोबत चालकासोबतच आणखी एक व्यक्तीही त्या कारमध्ये असल्याचं दिसत आहे. 

सेटवरुन निघाल्यानंतर या कारला अनेकांनीच वेढा घातल्याचं पाहायला मिळत असून, कोणी कारची काच फोडत आहे, तर कोणी चाकातील हवा काढताना दिसत आहे. 

कारमध्ये असणाऱ्या तनुश्रीच्या चेहऱ्यावरील भावही बरंच काही सांगून जात आहेत. 

तनुश्रीने या चित्रपटातील गाण्यात काम न करण्याचा निर्णय घेतला त्यावनंतर 'आयटम गर्ल' राखी सावंत हिची तिच्या जागी निवड करण्यात आली असून, तिच्यावर गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं होतं. 

आता हा व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून, नानांची काय प्रतिक्रिया असणार आणि कोणत्या नव्या चर्चांना तोंड फुटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.