VIDEO : सोनाक्षीला ट्रोल करणाऱ्या पिढिला 'रामायणा'बद्दल किती माहिती, चला पाहुया...

काहींच्या म्हणण्यानुसार पौराणिक कथांसंबंधित एखादी गोष्ट माहित नसणं ही अगदीच सामान्य बाब आहे

Updated: Oct 5, 2019, 01:15 PM IST
VIDEO : सोनाक्षीला ट्रोल करणाऱ्या पिढिला 'रामायणा'बद्दल किती माहिती, चला पाहुया... title=

मुंबई : एका टीव्ही कार्यक्रमात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिला पौराणिक कथा 'रामायणा'बद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही... आणि थोड्याच वेळात ट्विटरवर #YoSonakshiSoDumb ट्रेन्ड झालं. फेसबुक आणि ट्विटरवर जोक्स आणि मीम्सचा पूर आला. रामायणात असलेल्या उल्लेखाप्रमाणे हनुमानानं 'संजीवनी' कुणासाठी आणली होती? या प्रश्नाचं उत्तर सोनाक्षीला आलं नव्हतं. त्यामुळे ती अगदी काही वेळेत देशभरात चेष्ठेचा विषय ठरली... पण, सोशल मीडियावर सोनाक्षीला ट्रोल करणाऱ्यांच्या पिढीच्या काही शिलेदारांशी 'झी मीडिया'नं संवाद साधला. त्यांना रामायणासंबंधीत किती गोष्टी माहीत आहेत? आणि पौराणिक कथेविषयी एखादी गोष्ट माहित नाही, म्हणून सोनाक्षीसारख्या एखादी व्यक्ती ट्रोलची शिकार बनवणं कितपत योग्य आहे? यावर तरुणांचं काय म्हणणं आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न 'झी मीडिया'नं केला. 

सोनाक्षीला ट्रोल करणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या घरात सोनाक्षी राहते त्या घराचं नाव 'रामायण' आहे. वडिलांचं नाव रामाच्या छोट्या भावाच्या नावावर आधारित 'शत्रुघ्न' आहे आणि भावांचं नाव रामाच्या मुलाच्या नावावर लव आणि कुश आहे. त्यामुळे तिला या प्रश्नाचं उत्तर माहित असायलाच हवं होतं. परंतु, काहींच्या म्हणण्यानुसार पौराणिक कथांसंबंधित एखादी गोष्ट माहित नसणं ही अगदीच सामान्य बाब आहे... त्यासाठी केवळ एक सेलिब्रिटी आहे म्हणून सोनाक्षीला ट्रोल करणं योग्य नाही.