अभिनेता विराजस कुलकर्णीचा गर्लफ्रेंडसोबत रोमान्स

कॅप्शन क्रिएशनचा बादशाह विराजसने या फोटोला देखील आपल्या अंदाजात हटके कॅप्शन दिलंय. Oh my Gad... असं या फोटो खाली त्यानं लिहिलं आहे.

Updated: Jun 28, 2021, 09:53 AM IST
अभिनेता विराजस कुलकर्णीचा गर्लफ्रेंडसोबत रोमान्स

 मुंबई : 'माझा होशील ना' या मालिकेतील आदित्य अर्थात अभिनेता विराजस कुलकर्णी सध्या सगळ्याचाच लाडका सगळ्यांचा लाडका अभिनेता बनलाये. विराजसने  स्मॉल स्क्रिनवरील एन्ट्री करताच त्याच्या सोशल मीडियावरील फॅन फॉलोविंगमध्ये देखील वेगाने वाढ झाली. आता विराजस कधी सेटवरील तर कधी आपल्या खाजगी आय़ुष्यातील गोड क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्यात त्याच्या एकापेक्षा एक असा जबरदस्त कॅप्शनची देखील तितकीच हवा पाहायला मिळते.

त्यात अनेकांना ठावूकच असेल , की आपल्या आदित्यला त्याची रिअल लाईफमधील सई भेटलीये. आणि बऱ्याचदा तो गर्लफ्रेंड शिवानी रांगोळेसोबतचे गोड फोटोज शेअर करतानादिसतो. दोघेही वेगवेगळ्या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. त्यामुळे शुटींगमधून वेळ मिळाला की ही जोडी एकत्र क्वॉलिटी टाईम स्पेंड करताना दिसते.

नुकताच विराजसने शिवानीसोबतचा एक रोमॅन्टिक फोटो शेअर केलाये. कॅप्शन क्रिएशनचा बादशाह विराजसने या फोटोला देखील आपल्या अंदाजात हटके कॅप्शन दिलंय. Oh my Gad... असं या फोटो खाली त्यानं लिहिलं आहे.

या फोटोवर अनेकांनी कमेंट करत पसंती दर्शवलीये. पण दोघांनी अद्याप अधिकृतरित्या आपल्या रिलेशनशीपची बातमी चाहत्यांसोबत शेअर केलेली नाहीये, त्यामुळे विराजस- शिवानी एकमेकांना डेट करत असल्याचं कधी स्वत:हून चाहत्यांसमोर रिवील करणार याचीच चाहत्यांना ही उत्सुकता आहे.