सोनू निगमचा ३१ वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल, गायलंय 'महाभारत' टायटल ट्रॅक

सोनू निगम १६ वर्षांचे असतानाचा हा व्हिडिओ व्हायरल

Updated: May 7, 2020, 04:44 PM IST
सोनू निगमचा ३१ वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल, गायलंय 'महाभारत' टायटल ट्रॅक title=

मुंबई : सोनू निगम कोरोना व्हायरसमुळे असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दुबईत गेल्या महिन्याभरापासून अडकला आहे. सध्या सोनू निगमचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ जवळपास ३१ वर्षे जुना आहे. 

सोनू निगम १६ वर्षांचे असतानाचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका कार्यक्रमात सोनू महाभारत मालिकेचं टायटल साँग गाताना दिसत आहे. १९८९ मध्ये एक कॉन्सर्ट झालं त्याचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत बीआर चोप्रा आणि महाभारतचे भीष्म पितामहची भूमिका साकारणारे अभिनेता मुकेश खन्ना देखील दिसत आहेत.  

सोनू निगम यांचा आवाज ऐकून तुम्हाला गर्व वाटेल. १६ वर्षांच्या तरूणाने गायलेलं हे गाणं अंगावर शहारा आणतं यात शंकाच नाही.

सोनू निगम यांचा मोठा चाहता वर्ग आहे. वयाच्या १६ व्या वर्षी गायलेला हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. सोनू निगम यांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर आणि यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. इंदौरच्या तालकटोरा स्टेडिअममध्ये हे पूर्ण गाण गायलं आहे. हे गाणं आपल्याला पूर्णपणे लक्षात असल्याचं देखील सोनू निगम सांगतो. या व्हिडिओची पूर्ण आठवण सोनूने शेअर केली आहे.