अभिषेक बच्चनचं लग्नाच्या 'त्या' फोटोवर वक्तव्य, समोर आलं व्हायरल फोटोमागील सत्य

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचे सोशल मीडियावर जबरदस्त चाहते आहेत.

Updated: Sep 16, 2021, 07:19 PM IST
अभिषेक बच्चनचं लग्नाच्या 'त्या' फोटोवर वक्तव्य, समोर आलं व्हायरल फोटोमागील सत्य

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचे सोशल मीडियावर जबरदस्त चाहते आहेत. दोन्ही स्टार्सकडे सध्या अने प्रेजोक्टस आहेत. अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) सोशल मीडियावर खूपच अॅक्टीव असतो. तो त्याच्या जबरदस्त विनोदबुद्धीसाठी आणि ट्रोल्सला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ओळखला जातो. अलीकडे, अशी परिस्थिती निर्माण झाली की अभिषेक बच्चनला एका यूजरच्या ट्विटला प्रतिसाद द्यावा लागला.

ऐश्वर्या-अभिषेक हातात हात घालून दिसले

एका सोशल मीडिया यूजरने अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या लग्नाचा फोटो मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर पोस्ट केला आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय एकमेकांचे हात धरून उभे आहेत. ऐश्वर्या राय कोणाकडे तरी बघून हसत असते, तर अभिषेक बच्चनचे लक्ष कॅमेऱ्याकडे असते.

अभिषेककडून बनावट फोटोचे रहस्य उघड

जरी हा फोटो पाहायला खरा वाटत असला तरी, हा फोटो बनावट आहे. फोटो पाहिल्यानंतर अभिषेक बच्चनने स्वतः यावर प्रतिक्रिया दिली आहे. अभिषेक बच्चनने या फोटोवर उत्तर दिले आणि लिहिले, 'हा फोटोशॉप केलेला फोटो आहे.' अभिषेक बच्चनच्या या ट्विटवर त्याच्या सर्व चाहत्यांनी अभिनेत्याच्या लग्नाची खरे फोटो शेअर केले आहेत.

या चित्रपटांमध्ये अभिषेक बच्चन दिसणार

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिषेक बच्चनचा (Abhishek Bachchan) 'द बिग बुल' हा चित्रपट यापूर्वी रिलीज झाला होता. त्यामधील त्याच्या भूमिकेला लोकांकडून खूप पसंत केले गेले. आगामी काळात अभिषेकचे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्याचा 'बॉब बिस्वास' (Bob Biswas) हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहे, ज्यासाठी अभिषेकने खूप वजन वाढवले​होते. याशिवाय त्याचा 'दसवी' (Dasvi) हा चित्रपट देखील 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे.