डान्स करता करता स्टेजवर पडली सपना चौधरी, पाहा व्हिडीओ

डान्स करताना अचानक खाली कोसळली सपना चौधरी, नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ

Updated: Oct 17, 2021, 10:38 PM IST
डान्स करता करता स्टेजवर पडली सपना चौधरी, पाहा व्हिडीओ

मुंबई: स्टेज डान्स म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा आठवते सपना चौधरी. सपना चौधरी स्टेज डान्समुळे सोशल मीडियावरच नाही तर टीव्हीवरही खूप प्रसिद्ध झाली. सपना प्रमाणेच अनेक मुली पुढे स्टेज डान्ससाठी आल्या. देसी क्वीन आणि डान्सिंग क्वीन म्हणून सपना चौधरीची एक वेगळी ओळख आहे. हरियाणवी डान्सर ते बॉलिवूडपर्यंत प्रवास करणाऱ्या सपना चौधरीचे जुने व्हिडिओ आजही व्हायरल होत आहेत.

सपना चौधरीचा आता आणखी एक जुना व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. 3 मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये चौधरी स्टेजवर नाचताना दिसत आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला हजारोंची गर्दी आहे. त्याच्या प्रत्येक पायरीवर गर्दी इतक्या मोठ्याने ओरडत आहे. पण या दरम्यान तिचा तोल एका टप्प्यात बिघडला आणि सपना चौधरी जोरात खाली पडली. 

सपना चौधरी खाली पडल्यानंतर तिने स्वत: ला खूप चांगल्या पद्धतीनं सावरलं. तेवढ्याचं उत्साहात पुन्हा डान्स करायला सुरुवात केली. तिचा उत्साह पाहून जमलेली लोक टाळ्य़ा वाजवतात. सपना हिरव्या रंगाच्या सूटमध्ये डान्स करताना दिसत आहे. सपना चौधरीचे चाहते अनेक आहेत. आजही तिच्या प्रत्येक फोटो व्हिडीओची सोशल मीडियावर चाहते आवर्जुन वाट पाहात असतात