VIRAL VIDEO : सलमाननं आई-वडिलांसाठी हे गाणं म्हटलं

१८ नोव्हेंबर रोजी अभिनेता सलमान खानच्या कुटुंबात डबल सेलिब्रेशनचं वातावरण होतं. या दिवशी सलमानच्या आई-वडिलांच्या म्हणजेच सलीम खान आणि सलमा खान यांच्या तसंच बहिण अर्पिता खान-शर्मा आणि आयुष शर्मा यांच्या लग्नाचा वाढदिवस होता.

Updated: Nov 21, 2017, 10:54 AM IST
VIRAL VIDEO : सलमाननं आई-वडिलांसाठी हे गाणं म्हटलं  title=

मुंबई : १८ नोव्हेंबर रोजी अभिनेता सलमान खानच्या कुटुंबात डबल सेलिब्रेशनचं वातावरण होतं. या दिवशी सलमानच्या आई-वडिलांच्या म्हणजेच सलीम खान आणि सलमा खान यांच्या तसंच बहिण अर्पिता खान-शर्मा आणि आयुष शर्मा यांच्या लग्नाचा वाढदिवस होता.

या दिवशी एक गाणं गात सलमाननं आपल्या आई-वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

सलमान सिनेमांत किंवा कार्यक्रमात गाताना अनेकदा दिसला असेल... पण, यावेळी आई-वडिलांसाठी गाताना तो थोडा भावूक झालेलाही दिसला. 

सोशल मीडियावर सलमानचा हा व्हिडिओ वायरल होतोय. या व्हिडिओत आई-वडिलांसाठी तो 'जब कोई बात बिगड जाए' हे गाणं गाताना दिसतोय. 

अर्पिताच्या घरी मुंबईत या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत युलिया वंतूर, मलाइका अरोरा, अमृता अरोरा, सोहा अली खान, कुणाल खेमू, दिया मिर्झा आणि इतर काही स्टार सहभागी झाले होते.