सोशल मीडियात या ‘डिंग डांग’ डान्सचा धुमाकूळ, व्हिडिओ व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ एका कपलकडून करण्यात आलेल्या डान्सला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.

Updated: Sep 19, 2017, 02:50 PM IST
सोशल मीडियात या ‘डिंग डांग’ डान्सचा धुमाकूळ, व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ एका कपलकडून करण्यात आलेल्या डान्सला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.

आतापर्यंत १३ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर अनेकांनी हा व्हिडिओ शेअरही केला आहे. 

Indian Dance Group MAYURI नावाच्या एका यू-ट्यूब चॅनेलने हा व्हिडिओ अपलोड केलाय. ‘डिंग डांग’ या लोकप्रिय गाण्यावर हे दोघे डान्स करत आहेत. टायगर श्रॉफ याच्या ‘मुन्ना मायकल’ या सिनेमातील हे गाणं आहे. ६ जुलैला हे गाणं अपलोड करण्यात आलं होतं. गेल्या तीन महिन्यात १३ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.