कोण आहे विराट-अनुष्काचा Bodyguard, एका कंपनीच्या CEO इतका मिळतो पगार

विरुष्काबरोबर कोणत्याही कार्यक्रमात त्यांच्या हा बॉडीगार्ड सावली सारखा त्यांच्याबरोबर असतो. त्यांच्या सुरक्षेसाठी चोवीस तास तैनात असलेल्या बॉडीगार्डचा पगार ऐकून व्हाल थक्क

Updated: Jan 25, 2023, 07:07 PM IST
कोण आहे विराट-अनुष्काचा Bodyguard, एका कंपनीच्या CEO इतका मिळतो पगार title=

Virushka Body Guard : सेलिब्रिटी कपलमध्ये (Celebrity Couples) सर्वात लोकप्रिय कपल मध्ये विरोट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma). बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virushka) यांचा प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होत असते. आपल्या आवडत्या विराट आणि अनुष्काला भेटण्यासाठी चाहते कोणत्याही थराला जातात. पण कधी कधी चाहत्यांच्या अतिरेकीपणाचा त्यांना त्रासही सहन करावा लागतो. त्यामुळे अनेक सेलिब्रेटी वैयक्तिक बॉडीगार्ड (Bodyguard) नेमतात. जो चोवीस तास या सेलिब्रेटींच्या सुरक्षेसाठी तैनात असतो. 

बॉडीगार्डचा तगडा पगार
सेलिब्रिटींना सुरक्षा देणारे हे बॉडिगार्ड्स शरीराने जितके पिळदार असतात तितकाच त्यांचा पगारही (Salary) तगडा असतो. काही बॉडीगार्ड्सना तर एखाद्या कंपनीच्या सीईओ इतका पगार मिळतो. विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या बॉडीगार्डही नेहमीच चर्चेत असतो. विराट-अनुष्काच्या बॉडीगार्डचं सोनू असं नाव आहे. विराट-अनुष्काच्या अनेक फोटोंमध्ये सोनू दिसतो. 

बॉडीगार्ड सोनूला किती पगार?
बॉडीगार्ड सोनू हा विराट-अनुष्का यांच्या लग्नाच्याआधीपासूनच अनुष्काचा बॉडीगार्ड आहे. लग्नानंतरही अनुष्काने सोनूला आपल्याबरोबर कायम ठेवलं आहे. सोनूचं खरं नाव प्रकाश सिंह असं आहे. कोणत्याही कार्यक्रमात तो अनुष्काबरोबर सावली सारखा असतो. त्यामुळेच अनुष्का सोनूला भरभक्कम पगार देते. सोनूचा वार्षिक पगार 1.2 करोड म्हणजे महिन्याला 10 लाख रुपये इतका आहे. एका कंपनीच्या सीईओलाही क्वचितच इतका पगार मिळत असेल. 

अनुष्काच्या लग्नानंतर सोनू आता दोघांचीही सुरक्षा करताना दिसतो. एखाद्या कार्यक्रमात विरुष्का सहभागी होतात, तेव्हा सोनू कायम त्यांच्या अवती-भवती त्यांची सुरक्षा करताना दिसतो. सोनूने काही कठिण प्रसंगातून अनुष्काचा बचावही केला आहे. 

अनुष्काच्या कुटुंबाचा सदस्य
अनुष्का शर्मला सोनूवर प्रचंड विश्वास आहे, इतकंच काय तर ती त्याला आपल्या कुटुंबातीलच एक सदस्य मानते. सोनूचा वाढदिवसही विराट-अनुष्का मोठ्या जल्लोषात साजरा करतात. 

बॉडीगार्ड्समध्ये सर्वाधिक पगार कोणाला?
सेलिब्रेटींच्या बॉडीगार्डसमध्ये सर्वाधिक पगार घेणाऱ्या यादीत अभिनेता सलमान खानच्या बॉडिगार्डचा सर्वात वरचा नंबर लागतो. गेली अनेक वर्ष शेरा सलमानचा बॉडीागार्ड म्हणून काम करतोय. शेराचा महिन्याचा पगार 15 लाख रुपये म्हणजे वर्षाला जवळपास दोन कोटी रुपये मिळतात. प्रसिद्ध गायक जस्टिन बिबर जेव्हा भारतात आला होता, तेव्हा शेराच त्याचा बॉडीगार्ड बनला होता. 

याशिवाय अमिताभ बच्चन यांच्या बॉडीगार्डचं नाव जितेंद्र शिंदे असं असून त्याची सॅलरी दीड कोटी रुपये इतकी आहे. अभिनेता आमिर खानच्या बॉडीगार्डचं नाव युवराज घोरपडे असं आहे, त्याचा पगार 2 करोडरुपये वार्षिक आहे. अक्षय कुमारच्या बॉडीगार्डचं नाव श्रेयस थले असं असून त्याला 1.2 कोटी रुपये वार्षित पगार मिळतो.