The Vaccine War फ्लॉप म्हणून फुकट तिकिटं वाटताय! विवेक अग्निहोत्री ट्रोल

Vivek Agnihotri The Vaccine War : विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत फ्री तिकिटाची ऑफर देताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल...

दिक्षा पाटील | Updated: Oct 1, 2023, 06:22 PM IST
The Vaccine War फ्लॉप म्हणून फुकट तिकिटं वाटताय! विवेक अग्निहोत्री ट्रोल title=
(Photo Credit : Social Media)

Vivek Agnihotri : गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा 'द वॅक्सीन वॉर' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले आहेत. तर इतक्यात प्रेक्षकांसाठी दिग्दर्शकानं एक ऑफर दिली आहे. त्यांनी अशी ऑफर देण्याचे एकच कारण आहे आणि ते म्हणजे हा चित्रपट सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवा. कशा प्रकारे आपल्या देशानं कोरोना महामारीवर विजय मिळवला हे सगळ्यांना कळायला हवं अशी त्यांची इच्छा आहे. मात्र, त्यांनी ही ऑफर दिल्यानंतरही प्रेक्षकांनी चित्रपट फ्लॉप होणार हे माहितीये म्हणून अशी ऑफर देतोय असं म्हटलं आहे. तर अनेकांनी काही झालं तरी चित्रपट पाहायला जाणार नाही हे सांगितलं आहे. 

विवेक अग्निहोत्रींनी दिली ऑफर? 

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून म्हणजेच पूर्वीच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या तिकिटावर ऑफर दिली आहे. विवेक अग्निहोत्री यावेळी म्हणाले की मित्रांनो आज रविवार आणि सोमवारी तर गांधी जयंतीची सुट्टी आहे. त्या निमित्तानं संपूर्ण कुटुंबासोबत द वॅक्सिन वॉर हा चित्रपट पाहायला जा आणि एक तिकिट फ्री मिळवा. हे फ्री तिकिट तुम्ही तुमचया घरी असलेल्या मोलकरीन किंवा कोणत्या मुलीला द्या. त्यांना या चित्रपटाचा आनंद घेऊ द्या. 

नेटकऱ्यांनी दिली अशी प्रतिक्रिया? 

विवेक अग्निहोत्री यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'विवेक अग्निहोत्री फुकटात तिकिट वाटत आहेत. पण फक्त तिकिट नाही तर मोलकरनीच्या येण्या जाण्याचा खर्च, पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंकसाठी देखील पैसे लागतात.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'ते म्हणतात ते वेळेला किंमत आहे. आपले तीन तास असे वाया नाही घालवू शकतो.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'अरे देवा काय वेळ आली आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला,  'कोणी येणार नाही, हे मी लिहून देऊ शकतो.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'फुकटात दिलं तरी जाणार नाही. एका तिकिटावर चार तिकिटं मोफत दिली तरी कोणी जाणार नाही.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'चित्रपट फ्लॉप होईल याची भीती आहे म्हणून एक तिकिट फ्री ही ऑफर देतोय.' 

हेही वाचा : 'ईडीच्या भितीनं भलेभले 'त्या' कळपात जाऊ लागेल...', किरण मानेंची पोस्ट चर्चेत

कोणते कलाकार आहेत?

या चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, अनुपम खेर, सप्तमी गौडा आणि रायमा सेन महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 28 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं तीन दिवसात 3.50 कोटींची कमाई केली आहे.