रणवीरची पत्नी असल्याचं दीपिका विसरली अन्...

पाहा पुढे काय झालं..... 

Updated: Sep 19, 2019, 09:55 AM IST
रणवीरची पत्नी असल्याचं दीपिका विसरली अन्...  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण ही कायमच तिच्या अष्टपैलू व्यक्तीमत्वासाठी ओळखली जाते. एक अभिनेत्री असण्यासोबतच दीपिका चित्रपट निर्मिती क्षेत्रातही सक्रिय आहे. शिवाय ती अनेक ब्रँडशी संलग्न आहे, तिचा स्वत:चाही वेगळा असा ब्रँड आहे. या साऱ्यामध्ये तिच्यात दडलेलं एका खेळाडूचं मन काही केल्या लपून राहत नाही. अशी ही अभिनेत्री तिच्या प्रत्येक भूमिकेला तितक्याच जबाबदारीने  निभावते. पण, नुकताच तिला एका महत्त्वाच्या गोष्टीचा किंबहुना तिच्या एका महत्त्वाच्या भूमिकेचाच विसर पडला होता. 

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हि़डिओ पाहून याचा अंदाज लावता येत आहे. ज्यामध्ये दीपिकाला नेमका कोणत्या गोष्टीचा विसर पडला, हे स्पष्ट होत आहे. लिव्ह, लव्ह, लाफ या स्वत:च्याच संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात खऱ्या आयुष्यात दीपिका तिच्या वाट्याला आलेल्या भूमिकांविषयी बोलत होती. ज्यामध्ये ती चक्क आपण विवाहित आहोत आणि अभिनेता रणवीर सिंगची पत्नी आहोत ही बाब विसरुनच गेली. मुख्य म्हणजे आपण विसरलेली बाब दुसऱ्याच व्यक्तीने लक्षात आणून दिल्यावर दीपिकाची प्रतिक्रिया पाहण्याजोगी होती. 

पाहा आयफासाठी रणवीरचा हटके लूक तर, आलियाचं 'हे' रुप

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दीपिका म्हणते, 'मी एक मुलगी आहे, मी एक बहीण आहे, एक अभिनेत्री आहे...'. तिच्या इतक्या बोलण्यावरच कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकांकडून 'आणि पत्नी...?' असा प्रश्नार्थक सूर आळवल्याचं पाहायला मिळतं. त्यावर उत्तर देत, 'हो मी पत्नीही आहे.... असे देवा मी विसरलेच', असं म्हणत दीपिका खोडकरपणे हसताना दिसते. तिचा हा दिलखुलास आणि खेळकर अंदाज हा नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे. मुख्य म्हणजे तिच्या या विरसभोळेपणावर आता पती, अभिनेचा रणवीर सिंग काही प्रतिक्रिया देतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.