जोधपूर : २० वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली. यावेळी पोलिसांसमोर सलमानचा माज कायम दिसून आला. सलमान दबंगच्या थाटत पोलिसांसोबत खुर्चीवर आणि टेबलावर हात टाकून बसल्याचे दिसत आहे. त्यामुळे सलमानला सामन्य कैद्याप्रमाणे वागणूक देणार या जोधपूर पोलिसांच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आलाय.
सलमान खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे सलमानचा तोरा कायम असल्याचे दिसून येत आहे. या फोटोमध्ये सलमान खान काही पोलिसांच्या घोळक्यात अगदी राजेशाही थाटामध्ये एक हात टेबलवर आणि एक पाय पुढे करुन खुर्चीवर हिरोसारखा बसलाय. शिक्षा झालेल्या एका कैद्याला तो सेलिब्रिटी आहे म्हणून अशी विशेष वागणूक मिळत आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
सलमानला इतर कैद्यांप्रमाणेच वागणूक दिली जाईल. त्याला जेलमधील सामान्य जेवणच दिले जाईल, असा दावा जोधपूरचे डिआयजी विक्रम सिंग यांनी केला होता. डिआयजींचा हा दावा आणि फोटोतील वास्तव पाहून प्रश्न उपस्थित करण्यात आलाय.
#TopStory: Jodhpur Sessions Court to hear bail application matter of #SalmanKhan in #BlackBuckPoachingCase (file pic) pic.twitter.com/0KpLQOUZU7
— ANI (@ANI) April 6, 2018
दरम्यान, आज सलमानच्या जामीन अर्जावर थोड्याचवेळात सुनावणी होणार आहे. काल त्याला शिक्षा सुनावल्यानंतर त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आलीय त्यामुळे त्याला गुरुवारची रात्र जेलमध्येच काढावी लागली. सलमानला कैदी नंबर १०६ देण्यात आला आहे. दरम्यान, सलमानने तुरुंगातलं जेवण नाकारल्याचीही माहिती आहे. त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून प्रकृती स्थिर आहे, असंही ते म्हणाले.