पाहा, 'धकधक गर्ल'चा पतीसोबत कधीही न पाहिलेला अंदाज

हा व्हिडिओ पाहता... 

Updated: Nov 24, 2019, 05:03 PM IST
पाहा, 'धकधक गर्ल'चा पतीसोबत कधीही न पाहिलेला अंदाज title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : हिंदी चित्रपटविश्वात गेल्या काही दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. 'धकधक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी तिच्या अभिनयाने आणि स्मितहास्याने कायमच चाहत्यांच्या मनावर राज्य करत राहिली आहे. अशा या अभिनेत्रीचा एक नवा अंदाज सध्या चाहत्यांना पाहायला मिळत आहे. 

माधुरीचा हा अंदाज म्हणजे तिचं गिटार वादन आणि गायन. सहसा सुट्टीचा दिवस हा कुटुंबीय किंवा मग मित्रपरिवारासमवेत व्यतीत करण्याला अनेकांचं प्राधान्य असतं. माधुरीनेही कामाच्या वेळापत्रकातून वेळ काढत अशा काही क्षणांचा आनंद लुटला आहे. 

सोशल मीडियावर तिने यावेळचा एक व्हिडिओसुद्धा शेअर केला, ज्यामध्ये माधुरी चक्क गिटार वाजवताना आणि गाणं गुणगुणताना दिसत आहे. यामध्ये तिला पतीचीही साथ मिळाली आहे.  John Legendचं All of Me या गाण्याचे सूर छेडणारी ही मंडळी अनेकांची मनं जिंकत आहेत. 

मुख्य म्हणजे तिचा हा व्हिडिओ पाहता, अभिनय आणि नृत्य कौशल्यासोबतच गायक आणि वादनकलेतही माधुरी तितक्याच सहजपणे आपली जादू करते हेच स्पष्ट होत आहे. सध्या माधुरी काही जाहिराती आणि रिऍलिटी शोच्या चित्रीकरणाला वेळ देत आहे. येत्या काळात ती कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार की निर्मिती क्षेत्रातच नव्या कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.