'वेलकम टू न्यूयॉर्क'चा ट्रेलर रिलीज - पोट धरून हसायला सज्ज व्हा

बराच काळ हिंदी टेलिव्हिजनमध्ये रिएलिटी शोचा जज म्हणून दिसणारा करण जोहर आता लवकरच बॉलिवूड चित्रपटामध्ये झळकणार आहे. 

Updated: Jan 22, 2018, 08:37 PM IST
'वेलकम टू न्यूयॉर्क'चा ट्रेलर रिलीज - पोट धरून हसायला सज्ज व्हा  title=

मुंबई : बराच काळ हिंदी टेलिव्हिजनमध्ये रिएलिटी शोचा जज म्हणून दिसणारा करण जोहर आता लवकरच बॉलिवूड चित्रपटामध्ये झळकणार आहे. 
करण जोहरच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रीलिज करण्यात आला आहे. 

बडी स्टार कास्ट 

आज 'वेलकम टू न्यूयॉर्क' या हिंदी कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये रितेश देशमुख, लारा दत्ता, राणा दग्गुभत्ती, सुशांतसिंग राजपूत, सोनाक्षी सिन्हा, बमन इराणी, करण जोहर अशी भली मोठी स्टारकास्ट आहे.  

 

 

23 फेब्रुवारीला चित्रपट रसिकांच्या भेटीला 

'वेलकम टू न्यूयॉर्क' या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर हा चित्रपट निखळ मनोरंजन करेल याचे संकेत मिळत आहे. हा चित्रपट 23 फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरूवात शोले चित्रपटातील गब्बरच्या डायलॉगने होते. 

हसून हसून व्हाल लोटपोट 

लारा दत्ता या चित्रपटामध्ये मॅनेजमेंट कंपनीची प्रमुख असते. ती 'आयफा' सोहळ्याचे आयोजन करते. या शोमध्ये 'करण जोहर' डबल रोलमध्ये दिसणार आहे. 
सोनाक्षी सिन्हा फॅशन डिझायनरच्या भूमिकेत आहे. दिलजित या पंजाबी सिनेसृष्टीतील सुपरस्टारसोबत तिची कॉमेडी केमेस्ट्री खूपच मनोरंजन करणारी ठरणार आहे.