Miss universe हा मान पटकावल्यानंतर हरनाझ संधूला मिळालं एवढं बक्षिस आणि या सुविधा

भारतातील २१ वर्षाची हरनाज कौर संधूने मिस यूनिवर्स 2021 हा किताब पटकावलाय.

Updated: Dec 13, 2021, 01:58 PM IST
 Miss universe हा मान पटकावल्यानंतर हरनाझ संधूला मिळालं एवढं बक्षिस आणि या सुविधा title=

मुंबई : भारतातील २१ वर्षाची हरनाज कौर संधूने मिस यूनिवर्स 2021 हा किताब पटकावलाय. याआधी २००० मध्ये अभिनेत्री लारा दत्ताने आणि १९९४ मध्ये सुष्मिता सेनने देखील हा मान पटकावला होता. इजराईलच्या इवियट शहरमध्ये पार पडलेल्या LIVA मिस डीवा यूनिवर्स 2021 मध्ये हरनाज सिंधूने 75 देशाच्या सुंदर महिलांवर मात करत हा पुस्कार आपल्या नावे केलाायं. पण तुम्हाला माहितीये हा किताब पटकावल्यानंतर हरनाजला काय-काय सुविधा मिळणारेत.

कॅश प्राईज
बातमीनुसार, मिस युनिव्हर्स 2021 चा किताब जिंकणाऱ्या स्पर्धकाला जवळपास 250,000 डॉलर म्हणजेच 1,89,15,987  रोख स्वरूपात बक्षीस मिळतं. याचबरोबर रोख बक्षीसासोबतच, हरनाजला इतरही अनेक सुविधा मिळतील

-फ्री वर्ल्ड टूर
- न्यूयॉर्क शहरातील मिस युनिव्हर्स अपार्टमेंटमध्ये वर्षभर राहता येईल. कदाचित तिला मिस यूएसएसोबत हा फ्लॅट शेअर करावा लागेल.
-मिस युनिव्हर्स अपार्टमेंटमध्ये तिच्या एक वर्षाच्या वास्तव्यादरम्यान किराणा सामान आणि वाहतूक यासारख्या सुविधा उपलब्ध असतील.
-तिला मेकअप आर्टिस्ट आणि असिस्टंटची टीमही मिळेल.
-एक वर्षासाठी तिला मेकअप, हेअर स्टाईल, शूज, कपडे आणि स्किन केअर उत्पादने मिळतील.
- व्यावसायिक शैली, त्वचाविज्ञान आणि दंत सेवा मिळतील..
-प्रवास करताना हॉटेलचा मुक्काम आणि जेवणाचा खर्च. या सगळ्या सुविधा तिला मोफत मिळतील.

कोण आहे हरनाझ संधू ?
हरनाझ संधू चंदीगडची राहणारी असून ती मॉडेल आणि अभिनेत्री देखील आहे. हरनाझने पंजाबी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. हरनाझ ‘यारा दियां पू बारां’ आणि ‘बाई जी कुट्टांगे’ या पंजाबी सिनेमांमध्ये ती झळकली आहे.

तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेत विजय मिळवला आहे. त्याशिवाय ती अभ्यासातही हुशार आहे. तिचे पदवी शिक्षण पूर्ण झालं असून सध्या ती सध्या पदव्यूतर शिक्षण पूर्ण करत आहे. तिला घोडेस्वारी आणि स्विमींगची आवड आहे.