'सुहागरात में आपने क्या किया?', अडल्ट सीन करणाऱ्या अभिनेत्रीला सवाल

अडल्ट सीन करणाऱ्या अभिनेत्रीला लग्नानंतर पहिल्या रात्रीचा प्रश्न विचारताचं ती भडकली  

Updated: Nov 12, 2021, 08:09 AM IST
'सुहागरात में आपने क्या किया?', अडल्ट सीन करणाऱ्या अभिनेत्रीला सवाल title=

मुंबई : अभिनेत्री  रचिता राम  (Rachita Ram) नुकताचं दिलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. मुलाखतीत तिला असा प्रश्न विचारण्यात आला ज्यामुळे ती प्रचंड संतापली. 'डिंपल क्वीन' (Dimple Queen) म्हणून ओळखली जाणारी रचिताला  तू लग्नाच्या पहिल्या रात्री काय केलं होतं? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना रचिता प्रचंड भडकली आणि तिने जे उत्तर दिलं ते ऐकून जमलेले सर्व थक्क झाले. रचिरा अनेक चित्रपटांमध्ये इंटीमेट सीन दिले आहेत.  ज्यामुळे तिला सतत धारेवर धरलं जातं. 

या प्रश्नाच्या उत्तरात रचिता म्हणाली की, चित्रपट आणि स्क्रिप्टला जे हवे होते तेच तिने केले. 'लव यू रच्चू'मधील रचिता आणि अजय रावचे बोल्ड सीन्स व्हायरल झाले आहेत. सध्या सर्वत्र चित्रपटामधील बोल्ड सीनची चर्चा आहे. अभिनेत्रीने बोल्ड सीन कधीच करणार नसल्याचे सांगितले होते. 'लव यू रच्चू'च्या प्रमोशनदरम्यान, जेव्हा अभिनेत्रीला तिचे वचन मोडून इंटिमेट सीन देण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने उलटसुलट प्रतिक्रिया दिली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rachita Ram (@rachita_instaofficial)

तू लग्नाच्या पहिल्या रात्री काय केलं? या प्रश्नाचं उत्तर देताना रचिरा म्हणाली, 'या ठिकाणी अनेक लोक आहेत, ज्यांचं लग्न झालं आहे. कुणालाही लाजवण्याचा माझा हेतू नाही. मी तुम्हांला सर्वसाधारणपणे विचारतेय... मला सांगा लग्नानंतरच्या पहिल्या रात्री लोक काय करतात? लग्नाच्या रात्री तुम्ही काय केले?' अभिनेत्रीच्या प्रश्नावर पत्रकार परिषदेत लोक थक्क झाले.

रचिता आणि राम तिचा मुद्दा पूर्ण करत म्हणाले, 'ते रोमान्स करतात ना? चित्रपटातही तेच दाखवण्यात आले आहे. बोल्ड सीन करण्याबाबत अभिनेत्रीने आधीच स्पष्ट केले आहे की, जर मी ते सीन केले असतील तर त्यामागे कारण आहे. हे चित्रपट पाहिल्यानंतर कळेल.'