या कारणामुळे दीपिका रणबीरचं झालं होतं ब्रेकअप

बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आपला ३८ वा वाढदिवस साजरा करणार आहे.

Updated: Sep 27, 2021, 08:42 PM IST
या कारणामुळे दीपिका रणबीरचं झालं होतं ब्रेकअप

मुंबई : 28 सप्टेंबरला बॉलिवूड स्टार रणबीर कपूरचा वाढदिवस आहे. बॉलिवूडमध्ये त्याच्या उत्कृष्ट अभिनयाव्यतिरिक्त, रणबीर त्याच्या वैयक्तिक संबंधांसाठी देखील खूप प्रसिद्ध आहे. रणबीर कपूर एकेकाळी अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि नंतर कतरिना कैफ यांच्याशी सिरीअस रिलेशनशिपमध्ये होता. असं म्हटलं जातं की, दीपिकाला बराच काळ डेट करत असूनही, त्यांच्या रिलेशनशिपमध्ये असं काही घडलं ज्यामुळे त्यांचं नातं कायमचं दुरावलं.

दीपिका पदुकोण एका मुलाखतीदरम्यान तिच्या आणि रणबीरच्या नात्याबद्दल मोकळेपणाने बोलली होती. अभिनेत्रीने सांगितलं होतं की, तिच्या आजूबाजूच्या लोकांनी तिला सांगितलं होतं की, रणबीर तिला फसवत आहे. मात्र, या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून दीपिकाने रणबीरला दुसरी संधी देणं अधिक चांगलं मानलं होतं. मात्र, यानंतर, असं  काय घडले की रणबीर किंवा दीपिका दोघांनीही अपेक्षा केली नव्हती, जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, दीपिकाने स्वतः रणबीरला रंगेहात पकडलं आहे.

बातमीनुसार, या घटनेनंतर रणबीर आणि दीपिकाचं ब्रेकअप झालं. मात्र या दोघांच ब्रेकअप झालं असलं तरीही रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण अजूनही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. जर आपण या दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल बोललो तर रणबीर कपूरचा आगामी सिनेमा 'ब्रह्मास्त्र' लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमांत त्याच्यासोबत आलिया भट्ट देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दुसरीकडे दीपिका पादुकोण शाहरुख़ खानचा बहुचर्चित सिनेमा पठान मध्ये झळकणार आहे. या दिवसांत फिल्म पठान की शूटिंग चालू आहे.