जेव्हा Jeetendra बरोबर Hema Maliniचं लग्न तोडायला पोहचले होते धर्मेंद्र

जितेंद्र आणि हेमामालिनी यांचं मद्रासमधील एका हॉटेलमध्ये होणार होतं लग्न 

Updated: Apr 17, 2021, 01:09 AM IST
जेव्हा Jeetendra बरोबर Hema Maliniचं लग्न तोडायला पोहचले होते धर्मेंद्र

मुंबई : बॉलीवूड स्टार धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांची प्रेम कथा एखाद्या सिनेमा पेक्षा कमी नाही. एका वृत्तानुसार धर्मेंद्र यांच्या आधी हेमा मालिनी जितेंद्र बरोबर लग्नबंधनात अडकणार होत्या. हे दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे एवढेच नव्हे तर, हेमामालिनी यांच्या परिवाराला सुद्धा जितेंद्र भरपूर पसंद होते. एका रिपोर्टनुसार जितेंद्र आणि हेमामालिनी यांच्या लग्नाची डेट सुद्धा फिक्स झाली होती

असं म्हणतात की, लग्न मद्रासमधील एका हॉटेलमध्ये हे लग्न होणार होतं. ज्या दिवशी लग्न होणार होतं त्याच दिवशी अभिनेता धर्मेंद्र जितेंद्रची गर्लफ्रेंड शोभासोबत तिथे पोहोचले एका रिपोर्टनुसार, या लग्नसोहळ्या मध्ये बरीच खळबळ उडाली होती. हे लग्न थांबवण्यासाठी दोघेही चेन्नईला रवाना झाले. ही वेगळी बाब आहे की नंतर धर्मेंद्रने हेमासोबत दुसरं लग्न केलं. हे ब्रेक-अप पाहून हेमा यांचे वडील नरवस झाले. त्यानंतर त्यांनी धर्मेंद्रला तिथून निघण्यास सांगितलं 

त्याचवेळी जितेंद्र आणि हेमामालिनी यांना हे लग्न थांबवणं आणि थोडा वेळ एकमेकांना देणं हे योग्य वाटलं. मग काय या दोघांनीही फायनली वेगळा व्हायचा निर्णय घेतला. हेमाशी लग्न करण्याचं जितेंद्रचे स्वप्न अधूरच राहिलं. त्यानंतर जितेंद्रने 1976 मध्ये गर्लफ्रेंन्ड शोभाशी लग्न केले. अनेक मुलाखतीमध्ये हेमामालिनी यांनी सांगितले आहे की, त्यांच्या वडिलांना धर्मेंद्र आधी अजिबात पसंद न्हवते. 

एकदा एका मुलाखतीदरम्यान जेव्हा त्यांना विचारले गेले होते की, त्यांनी हेमाला कधी प्रपोज केले आहे का? यावर जितेंद्र म्हणाले, 'मला माझ्या आयुष्यातील त्या विषयावर बोलायचं नाही. त्यांची मुलं मोठी झाली आहेत आणि माझीसुद्धा. याबद्दल आता बोलणे लाजिरवाणे ठरेल. '