मुंबई : बॉलिवूड अभिनेते ओमपुरी आणि नसीरुद्दीन शाह यांची मैत्री चित्रपटसृष्टीमध्ये खूप गाजली होती. ओमपुरी आता या जगात नाहीत. पण नसीरुद्दीन यांना कायम त्यांची कमतरता जाणवते. हे त्यांनी आपल्या पुस्तकातही लिहीलं आहे. ओमपुरी केवळ नसीरुद्दीन शहा यांचे मित्र नव्हते, तर त्यांचे जीवनदाता देखील होते. ओमपुरी यांनी अपघातात नसीरुद्दीन शाह यांचा जीव वाचवला. काय घडलं होतं नेमकं? जाणून घ्या
नसीरुद्दीन शाह यांनी 'अँड देन वन डे: अ मेमोयर' या आत्मचरित्रात आपल्यासोबत घडलेल्या घटनेचा उल्लेख केला आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, एकदा ओमपुरीमुळे त्यांचे प्राण वाचले आहेत
नसीरुद्दीन शाह यांनी या पुस्तकात त्यांच्या सोबत घडलेल्या घटनेचा संदर्भ देत असं लिहिलं आहे की, एकदा ते रेस्टॉरंटमध्ये ओमपुरी आणि त्यांच्या मित्रांसोबत बसले होते. प्रत्येक गोष्ट सामान्य होती. त्यानंतर त्यांच्यावर अचानक मागून हल्ला झाला.
नसीर म्हणाले की, त्यांच्या जुन्या मित्राने सूड उगवण्यासाठी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला होता, त्यानंतर ओमपुरी यांनी माझा जीव वाचवला, त्या मित्राकडून त्यांना चाकू हिसकावून घेतला आणि ताबडतोब मला पोलिसांच्या गाडीतून दवाखान्यात नेलं.
शहा यांच्या आत्मचरित्रानुसार ही घटना 1977 मध्ये घडली आहे. जेव्हा त्यांच्या 'भूमिका' या चित्रपटाचं शूटिंग सुरु होतं. ओम आणि नसीर रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते, तेव्हा त्याचा एक जुना मित्र जसपाल त्यांच्यावर वॉच ठेवून होता. आणि अचानक त्याने नसीर यांच्या पाठीवर वार केला.
नसिर यांनी पुढे लिहीलं आहे की, ओम यांनी पोलिसांची परवानगी न घेता त्यांच्या गाडीत बसला आणि पोलिसांना माझ्याशी विनम्रतेने वागण्यास सांगितलं, अखेर त्यांना जुहू मधील कूपर रुग्णालयात नेण्यात आलं. हा संपूर्ण किस्सा नसीरुद्दीन शाह यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिला आहे.