जेव्हा सोनमला 'दीपिका'च्या नावानं हाक मारली जाते...

बॉलिवूडच्या अभिनेत्री एकमेकिंच्या मैत्रिणी असण्याचा कितीही आव आणो पण त्यांच्यातील स्पर्धा त्यांच्यात कधीच मैत्री होऊ देत नाही. सोनम कपूर आणि दीपिका पादूकोणमध्येही सध्या असचं काहीसं घडतयं. 

Updated: Jun 2, 2017, 10:29 AM IST
जेव्हा सोनमला 'दीपिका'च्या नावानं हाक मारली जाते...

मुंबई : बॉलिवूडच्या अभिनेत्री एकमेकिंच्या मैत्रिणी असण्याचा कितीही आव आणो पण त्यांच्यातील स्पर्धा त्यांच्यात कधीच मैत्री होऊ देत नाही. सोनम कपूर आणि दीपिका पादूकोणमध्येही सध्या असचं काहीसं घडतयं. 

सोनम कपूरला दीपिका पादूकोणच्या नावाने हाक मारल्यावर सोनमची रिअॅक्शन बघण्यासारखी होती..अशीच रिअॅक्शन दीपिकानं तिला प्रियांकाच्या नावाने हाक मारल्यावर दिली होती. 

एकीकडे दीपिकाने वेस्टर्न मीडियावर वर्णभेदाचा आरोप केला होता तर दुसरीकडे सोनम या कृत्याला छोटीशी गोष्ट म्हणतेय.
नुकतंच कान्स फिल्म फेस्टिव्हल 2017मध्ये एक इंटरनॅशनल पब्लिकेशन सोनमला दीपिका समजली होती. याचं उत्तर सोनमनं सोशल मीडियावर तिच्या अंदाजात दिलंय.

'१००० फोटोंमध्ये योग्य नाव टॅग करण्यात आलं. पण एकात जर का दुसऱ्याचं नाव टॅग झालं तर त्याला चूक समजायची की मला ओळखण्यात चूक झाली असं म्हणायचं. आता लोकांनीही त्यांची मतं बदलायला हवी. तसेच पीआर टीमने फैलवलेल्या गोष्टींकडे कानाडोळा करावा' असं सोनम म्हणतेय. 

सोनमला तिला दीपिकाच्या नावाने हाक मारण्याचा राग तर आला आहेच पण सोनम ही गोष्ट मानण्याऐवजी मीडियाला ब्लेम करतेय... आणि सोनमने ज्या पीआर टीमवर बोट उचललं आहे ती तर दीपिका पादूकोणचीच टीम आहे. आता दीपिका सोनमला काय उत्तर देते? हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.