'या' अभिनेत्रीकडून चॉकलेट घेतल्यानंतर सिनेमात काम करण्यास तयार झाले होते ऋषी कपूर, काय आहे हा किस्सा

ऋषी कपूर यांनी शेअर केला हा किस्सा 

Updated: Apr 30, 2021, 11:21 AM IST
'या' अभिनेत्रीकडून चॉकलेट घेतल्यानंतर सिनेमात काम करण्यास तयार झाले होते ऋषी कपूर, काय आहे हा किस्सा

मुंबई : अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक ऋषी कपूर आज आपल्यात नाहीत पण त्यांच्या आठवणी कायमच सोबत राहतील. ऋषी कपूर यांनी एकाहून एक असे हिट सिनेमे दिले आहे. ऋषी कपूर हे सिनेसृष्टीतील असं नाव आहे ज्यांनी दर्शकांचं खूप मोठ मनोरंजन केलं. ऋषी कपूर हे अशा कुटुंबातील होते ज्या कुटुंबांच सिनेसृष्टीत मोठं योगदान आहे. आज आपण त्यांचे अनसिन किस्से पाहणार आहोत. एकदा त्यांना चक्क चॉकलेट देऊन सीन शूट करण्यास सांगितलं होतं. 

अनेकांना असं वाटतं की, ऋषी कपूर यांचा "मेरा नाम जोकर' हा सिनेमा पहिला होता. मात्र ऋषी कपूर यांचा 'श्री 420' सिनेमा हा चाइल्ड आर्टिस्ट म्हणून पहिला सिनेमा केला. 'प्यार हुआ इकरार हुआ' या सिनेमात राज कपूर आणि नगगिस यांचा रोमान्स पाहायला मिळाला. या गाण्यात तीन मुलं एकमेकांचा हात पकडून चालताना दिसत आहे. यामधील सर्वात लहान मुलं जे अतिशय सुंदर आहे ते ऋषी कपूर आहेत. या सिनेमातील इतर दोन मुलं म्हणजे ऋषी कपूर यांचे बहिण-भाऊ आहेत. 

हा सीन करण्याकरता नरगिस यांनी ऋषी कपूर यांना चॉकलेट दिलं होतं. चॉकलेट घेतल्यानंतरच ऋषी कपूर यांनी पावसात भिजत हा सीन केला होता. या सीनबद्दल ऋषी कपूर यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं. त्यावेळी ऋषी कपूर यांनी या सिनमागची गोष्ट सांगितली होती. 

ऋषी कपूर यांनी सांगितलं की,'गाण्यात माझं वय अतिशय कमी होतं. गाण्यात माझ्या बहिण-भावासोबत रस्त्याच्या किनाऱ्यावर चालत जावं लागलं. माझा हा सीन बघायला अतिशय सोपं होतं मात्र शूट करणं खूप कठीण होतं. हा सीन पावसात शूट झाला. मी जसं वॉक करायला सुरूवात झाली तेव्हा माझ्या चेहऱ्यावर पाणी पडू लागलं. मी खूप रडू लागलं आणि तेव्हा मी माझे डोळे बंद करून घेतले. तेव्हा संपूर्ण शुटिंग थांबवण्यात आलं. नरगिस माझ्याजवळ आल्या आणि त्यांनी मी तुला च़ॉकलेट देणार असं सांगितल. आणि तेव्हा तो सीन शूट झाला '