जेव्हा रेखा यांनी बहिणीच्या सासरी सर्वांना केलं हैराण, बघतचं राहिली सासू

रेखा यांनी गाजवलं बहिणीचं सासर; दिराशी खास नातं, सासूला बसला धक्का   

Updated: Feb 17, 2022, 12:12 PM IST
जेव्हा रेखा यांनी बहिणीच्या सासरी सर्वांना केलं हैराण, बघतचं राहिली सासू  title=

मुंबई : बॉलिवूडच्या एव्हर ग्रीन अभिनेत्री रेखा आज अभिनयापासून दूर असल्यातरी रोज कोणत्या-न-कोणत्या कारणामुळे त्या चर्चेत असतात. त्यांची प्रसिद्धी आणि लोकप्रियतेच्या पुढे सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्री देखील फेल आहेत... रेखा यांनी बॉलिवूडला अनेक हीट सिनेमे दिले आहेत. त्यातील एक म्हणजे 'खुबसूरत'...  

सिनेमाची कथा पूर्णपणे एकत्रित कुटुंबपद्धती भोवती फिरताना दिसत आहे. सिनेमात रेखा यांनी एका लबाड मुलीची भूमिका बजावली आहे. एक अशी मुलगी जी तिचं आयुष्य बिनधानस्त जगते..

सध्या रेखा यांच्या 'खुबसूरत' सिनेमातील एक व्हिीडओ सध्या तुफाम व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये रेखा यांची बहिणीच्या सासरी एन्ट्री होते आणि घरातील सर्व चित्र बदलून जातं..

ज्या घरात प्रत्येक गोष्टीसाठी कायदे नियम असतात. त्याठिकाणी रेखा सर्व नियम मोडून बिनधास्त जगतात.. बहिणीच्या दिरासोबत होणारी रेखा यांची मस्ती आणि रागाने त्यांच्याकडे पाहाणारी सासू... या सर्व गोष्टींमुळे सिनेमा तुफान गाजला. 

1980 साली प्रदर्शित झालेला 'खुबसूरत' सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. सिनेमाच्या कथेतून कल्पना घेऊन 2014 मध्ये पुन्हा सिनेमाचा सिक्वल तयार करण्यात आला. 

ज्यामध्ये अभिनेत्री सोनम कपूर मुख्य भूमिकेत होती. सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नसला तरी सिनेमातील कॉमेडीने लोकांना खूप हसवले. सिनेमात सोनम कपूरसोबत फवाद खान आणि रत्ना पाठक देखील मुख्य भूमिकेत होते.