close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सलमानकडून रणबीरच्या कानशिलात...

हे आहे वादाचं खरं कारण 

Updated: Sep 28, 2019, 01:53 PM IST
सलमानकडून रणबीरच्या कानशिलात...

मुंबई : रणबीर कपूर आणि सलमान खान यांच्यातील वाद कायम जगासमोर आला आहे. यामागचं कारण आहे अभिनेत्री कतरिना कैफ. कतरिना कैफ आणि सलमान खान यांच्यात रणबीर कपूरमुळे ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. अनेकदा सलमान आणि रणबीर कार्यक्रमात एकमेकांसमोर आले तरी ते बोलत नाहीत. आज रणबीर कपूरचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने जाणून घेऊया हा किस्सा... 

इंटरनॅशनल बिझनेस टाइम्सनुसार, ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा रणबीर कपूर स्टार किड म्हणून ओळखला जायचा. बॉलिवूडमध्ये तो अगदी न्यूकमर होता. सलमान आणि रणबीर कपूरसोबत झालेल्या वादाची ही घटना मुंबईतील एका वीआयपी क्लबमध्ये घडली होती. 

यावेळी संजय दत्तदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. सलमान आणि संजय आपल्या 'वाँटेड' आणि 'रेडी' या दोन सिनेमांची सक्सेस पार्टी करत होते. यावेळी रणबीर तेथे पोहोचला आणि अचानक सलमान आणि रणबीर या दोघांमध्ये तेथे वाद झाला. हा वाद इतका वाढला की, सलमान खानचा स्वतःवरचा कंट्रोल सुटला आणि त्याने रणबीर कपूरच्या कानाखाली लगावली. यावेळी संजय दत्तने मध्ये पडून हे प्रकरण शांत केलं. रणबीर कपूर यानंतर त्या पबमधून निघून गेला. 

सलमान आणि रणबीर यांच्यात वाद आहे हे सगळ्यांना माहित 

यानंतर सलमान खानचे वडिल सलीम खान यांनी रणबीर कपूर आणि त्याचे वडिल ऋषी कपूर यांची माफी मागितली. यानंतर दोन्ही परिवारातील वाद शमले पण पुढे अभिनेत्री कतरिना कैफमुळे सलमान आणि रणबीरमधील तणाव वाढले.