केएल राहुल - अथिया कधी करणार लग्न? सुनील शेट्टीने दिली महत्त्वाची माहिती

केएल राहुल आणि आथियाच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे

Updated: Aug 23, 2022, 08:51 PM IST
केएल राहुल - अथिया कधी करणार लग्न? सुनील शेट्टीने दिली महत्त्वाची माहिती title=

अभिनेता सुनील शेट्टीची (Suniel Shetty) मुलगी, अथिया शेट्टी (Athiya Shetty) क्रिकेटपटू के.एल. राहुल (KL Rahul) याच्याशी असणाऱ्या नात्यामुळे कायम चर्चेत असते. मात्र अथिया आणि केएलनं त्यांचं प्रेमाचं नातं कधीच कोणापासून लपवलं नाही. कौटुंबीक समारंभांपासून एकमेकांसोबत परदेश दौऱ्यांवर जाण्यापर्यंत ही जोडी सातत्यानं एकमेकांसोबतच दिसले आहेत.

पण त्याआधीच अथिया आणि तिचा प्रियकर, क्रिकेटपटू के.एल. राहुल आता लिव्हइन रिलेशनशिपमध्ये (Athiya KL Rahul Live In Relationship) राहू लागले आहेत. मुंबईतील वांद्रे येथे असणाऱ्या कार्टर रोड परिसरात त्यांनी एक घर घेतलं आहे. अथिया जवळपास आठवड्याभरापूर्वीच केएलच्या घरी राहण्यास गेली आहे

या जोडप्याच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. दोघेही एकमेकांना 3 वर्षांपासून डेट करत आहेत. त्यात आता अथिया नवीन घरात शिफ्ट झाल्यानंतर लग्नाच्या बातम्यांनी पुन्हा एकदा जोर पकडला आहे. मात्र आता खुद्द सुनील शेट्टीने त्यांच्या लग्नाबाबत भाष्य केलं आहे.

इंस्टंट बॉलीवूडशी बोलताना सुनील शेट्टीने मुलीच्या लग्नाबाबत भाष्य केलं आहे. 'मला वाटतं मुलांनी ठरवल्याप्रमाणे होईल.  राहुलकडे आशिया कप, वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिका टूर, ऑस्ट्रेलिया टूर आहे. जेव्हा मुलांना ब्रेक मिळेल तेव्हा लग्न करतील. पण विश्रांतीच्या दिवशी लग्न होऊ शकत नाही, असे सुनील शेट्टीने म्हटले आहे.