Hrithik Roshan आणि Saba Azad यांच्यात नातं घट्ट होत असताना 'तो' आला आणि...!

Saba Azad Ex Boyfriend: हृतिकला डेट करण्यापूर्वी सबा आझाद होती या दिग्गज अभिनेत्याच्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये    

Updated: Dec 2, 2022, 06:34 PM IST
Hrithik Roshan आणि Saba Azad यांच्यात नातं घट्ट होत असताना 'तो' आला आणि...!
While Hrithik Roshan and Saba Azad relationship was getting stronger came and nz

Saba Azad and Imaad Shah: सध्या बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक नाती बिनधास्तपणे माध्यमांसमोर (Media) कबूली देताना दिसत आहेत. असंच एक नातं चर्चेत आहे. बॉलिवूडमधील चर्चेत असलेलं नवीन कपल हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आजाद (Saba Azad). त्यांना नेहमीच वेगवेगळ्या पार्टीना स्पोट केलं जात आहे. काही महिन्यांपूर्वी, जेव्हा हृतिक रोशन सबासोबत डिनर डेटवर (Dinner Date) स्पॉट झाला होता, तेव्हा त्यांच्या लिंकअपच्या (Linkup) बातम्या येऊ लागल्या होत्या. काही वेळातच स्पष्ट झाले ते दोघे रिलेशनशिपमध्ये (Relationship) आहेत आणि लवकरच ते लग्न करू शकतात. पण तुम्हाला माहित आहे का की हृतिकच्या आधी सबा इमाद शाहला (Imaad Shah) डेट (Date) करत होती आणि जर तुम्ही इमादला ओळखत नसाल तर सांगा की तो दुसरा कोणी नसून ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांचा मुलगा आहे. (While Hrithik Roshan and Saba Azad relationship was getting stronger came and nz)

सबाच्या एक्सने हृतिकचे मनापासून स्वागत

हृतिक आणि सबा मुंबईत स्पॉट झाले होते पण त्यांच्यासोबत इमाद शाह देखील दिसला. त्या तिघांना एकत्र पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. भेटताच हृतिकने इमादला मिठी मारली आणि यादरम्यान दोघांचे बाँडिंग पाहून सर्वच थक्क झाले. सबा आणि इमाद शाह हे दोघेही एका बँडचे भाग आहेत, दोघेही एका नाटकादरम्यान भेटले होते. सबाच्या आवाजाने इमाद चांगलाच प्रभावित झाला होता. म्हणूनच दोघांची भेट आजही सुरूच आहे आणि त्यांच्यातलं मैत्रीचे नाते आजही पाहायला मिळते. तिघेही रात्री उशिरा एकत्र दिसले आणि एकमेकांसोबत वेळही घालवला.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सबा हृतिकपेक्षा खूपच लहान

हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या वयात खूप अंतर आहे. सबा 11 वर्षांनी लहान आहे. हृतिक 48 आणि सबा 37 वर्षांची आहे, यामुळे देखील त्यांची नावे चर्चेत आहेत. असेही बोलले जात आहे की, सबा आता रोशन कुटुंबाच्या खूप जवळ आली आहे आणि दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. कारण घरच्यांनाही या नात्याला मान्यता दिली आहे.