'गोव्याचे किनाऱ्यावर' फेम अभिनेत्रीचं ठरलं लग्न, पाहा कोण आहे होणारा नवरा?

आता खऱ्या आयुष्यात सिद्धी आपल्या लग्नात कोणता हटके लूक करणार याची तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

Updated: Jul 23, 2021, 08:31 PM IST
 'गोव्याचे किनाऱ्यावर' फेम अभिनेत्रीचं ठरलं लग्न, पाहा कोण आहे होणारा नवरा?

मुंबई : 'गोव्याचे किनाऱ्यावर' हे गाणं रिलीज होताच एक चेहरा चांगलाच गाजला होता. या गाण्यात झळकलेल्या अभिनेत्रींची चांगलीच चर्चा रंगली होती. सिद्धी पाटणे असं या अभिनेत्रीचं नाव.

सिद्धीने या गाण्यात केलेला पारंपारिक लूक सगळ्याचंच लक्षवेधून घेणारा होता. या गाण्याने सिद्धीला एक वेगळी ओळख दिली. सोशल मीडियावर देखील तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. त्यानंतर अभिनेत्री सिद्धी पाटणेने अनेक प्रोजेक्टसमध्ये काम केलं .आता सिद्धी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

नुकतेच सिद्धीचे होणाऱ्या नवऱ्यासोबतचे काही फोटो समोर आले आहेत. 'गोव्याचे किनाऱ्यावर' या गाण्यात देखील सिद्धीने वेडिंग लूक केला होता.पण आता खऱ्या आयुष्यात सिद्धी आपल्या लग्नात कोणता हटके लूक करणार याची तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

सिद्धीने वाढदिवसाचा मुहूर्त साधत ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. होणाऱ्या पतीसोबत बर्थडे सेलिब्रेशन करतानाचे काही खास क्षण तिने शेअर केले आहेत. सिद्धीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव विशाल दलाल असं आहे. तो स्टुडिओ आर्किटेक्टचर आहे. 

बर्थडे गर्ल सिद्धीने आपल्या हटके वेस्टन आऊटफिटमध्ये सध्या सगळ्यांचच लक्षवेधून घेतलं.