Adipurush Release: बोबडं बोलण्यावरून डिवचलं; आज तोच अभिनेता देतोय प्रभु श्री रामाला आवाज

Adipurush Sharad Kelkar Voice: सध्या आदिपुरूष या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. उद्या हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तुम्हाला माहितीये का की प्रभासला एका लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्यानं आवाज दिला आहे. या लेखातून जाणून घेऊया या अभिनेत्याबद्दल! 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 16, 2023, 01:49 PM IST
Adipurush Release: बोबडं बोलण्यावरून डिवचलं; आज तोच अभिनेता देतोय प्रभु श्री रामाला आवाज title=
June 15, 2023 | Who is Sharad Kelkar the voice behind adipurush movie character prabhu shri ram played by prabhas

Adipurush Sharad Kelkar Voice: 'आदिपुरूष' चित्रपट हा यावर्षीचा most awaited सिनेमा राहिला आहे. 16 जून म्हणजे आज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सर्वांनाच प्रतिक्षा राहून लागली होती. 'आदिपुरूष' या चित्रपटाचे अॅडव्हास बुकिंगही जोरात सुरू होते. या चित्रपटानं अल्पावधीच मोठी रक्कम कमावली आहे. त्यामुळे या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाईही जोरदार असेल अशी सगळीकडूनच आशा व्यक्त केली जाते आहे. 'आदिपुरूष'मध्ये प्रभु श्रीरामाची भुमिका ही दाक्षिणात्त्य सुपरस्टार प्रभासनं केली आहे. त्याचसोबत रावणाची भुमिका ही सैफ अली खान यानं केली असून सीतेची भुमिका ही अभिनेत्री क्रिती सनन हिनं केली आहे. प्रभास हा दाक्षिणात्त्य सुपरस्टार आहे. 

त्याला या चित्रपटातून आवाज दिला आहे हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता शरद केळकर यानं. शरद केळकरच्या आवाजाचे आपण सगळेच जण फॅन्स आहोत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की तो एक चांगला अभिनेता तर आहेच परंतु त्याचसोबत तो एक चांगला व्हॉईस ओव्हर आर्टिस्टही आहे. त्यानं अनेक चित्रपटांसाठी आवाज दिला आहे. 'बाहुबली'साठीही त्यानचं प्रभासला आवाज दिला होता. तेव्हा त्याच्या आवाजाची जादू ही प्रभासच्या प्रभु श्री रामाच्या व्यक्तिरेखेतूनही आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शरद केळकरच्या फॅन्ससाठी ही एक मोठी पर्वणी आहे.

हेही वाचा - बॉलिवूडच्या 'या' पाच सेलिब्रेटींची अधूरी प्रेम कहाणी...

एकेकाळी शरद केळकरला बोबडं बोलण्यावरून डिवचले जायचे आज तो अभिनेता आपल्या आवजाच्या जादूनं प्रेक्षकांचे मनोरंजन करतो आहे आणि यावेळी खुद्द प्रभु श्री रामच्या भुमिकेसाठी त्यानं आपला आवाज दिला आहे. शरद केळकरला खरी अपाम लोकप्रियता मिळाली ती म्हणजे 'लयभारी' या चित्रपटातील त्याच्या संग्राम या भुमिकेमुळे. त्याआधी तो लोकप्रिय हिंदी टेलिव्हिजन अभिनेता होता. त्यानं अनेक लोकप्रिय हिंदी मालिका तसेच चित्रपटांतून कामं केली आहेत. 'लयभारी' या चित्रपटापुर्वी आलेल्या त्याच्या 'रामलीला' या चित्रपटातील भुमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. 2020 मध्ये आलेल्या 'तान्हाजी' या चित्रपटातून त्यानं छत्रपती शिवाजी महाराज यांची भुमिका साकारली होती. त्याच्या या भुमिकेसाठी त्यांचे प्रचंड कौतुक झाले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

Adipurush साठी शरद केळकरला मिळालेली ही संधी फारच खास आहे असं त्यानं अनेक मुलाखतीतून सांगितले आहे. त्यानं 'दसरा' या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला आवाज दिला होता. शरद केळकर आता नव्या कोणत्या भुमिकेतून प्रेक्षकांसमोर येतो आहे याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.