मुंबई : ‘सरसेनापती हंबीरराव’ हा ऐतिहासिक चित्रपट येत्या 27 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे फक्त ट्रेलर पाहून आतापासूनच प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
अभिनेता गश्मीर महाजनी हा या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तर, अभिनेता प्रविण तरडे हे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा साकारत आहे.
आता या चित्रपटातील आणखी एका महत्वाच्या भूमिकेवरील पडदा दूर झाला आहे. सरसेनापती हंबीरराव यांच्या पत्नी "सौ. लक्ष्मीबाई हंबीरराव मोहिते" यांचा पहिला लूक समोर आला आहे.
प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल तरडे या "सौ. लक्ष्मीबाई हंबीरराव मोहिते" यांची भूमिका साकारणार आहेत. त्यामुळे रिअल लाइफ जोडी आता ऑनस्क्रीनदेखील नवरा- बायकोची भूमिका साकारण्यास सज्ज झाले आहेत. स्नेहल यांनी प्रवीण तरडे यांच्यासोबत काही नाटकात तसेच देऊळबंद, चिंटू २ आणि व्हें’टिलेटर अशा चित्रपटांमध्येही काम केले आहे.