डॉक्टर डॉनच्या सेटवर कोण आहे हा नवीन कलाकार?

मालिकेला नवं वळण 

Updated: Jan 19, 2021, 12:08 PM IST
डॉक्टर डॉनच्या सेटवर कोण आहे हा नवीन कलाकार?

मुंबई : झी युवावरील डॉक्टर डॉन या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. मालिकेची कथा हटके आहेच पण यातल्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने या कथेला चांगला न्याय दिलाय हे महत्वाचे. म्हणूनच सोशल मिडीयावरुन किंवा वैयक्तिक स्तरावरही यातल्या कलाकारांना प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळतेय. डॉ. मोनिका श्रीखंडे म्हणजे प्रेक्षकांची लाडकी डॉलीबाई महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतेय. तिचा अभिनय तसंच मालिकेतील लुक प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Yuva (@zeeyuva)

या मालिकेत नेहमीच काही ना काही ट्विस्ट येत असतात. पण आता या मालिकेत एक नवीन एन्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मोनिकाने देवाला स्वतःच प्रेम वाचवण्यासाठी उशीर करू नको असं सांगितलं होतं कदाचित कोणीतरी दुसरं येऊन तिला घेऊन जाईल अशी चिंता देखील ती देवासमोर व्यक्त करते.

 

आता ही दुसरी व्यक्ती शूटिंगच्या सेटवर येऊन पोहोचली आहे पण ती कोण आहे हे श्वेताने हा फोटो सोशल मीडियावर टाकून प्रेक्षकांना ओळखायला सांगितलं आहे. आता हा नवीन कलाकार कोण आहे आणि मालिकेत हि नवीन व्यक्तिरेखा काय वळण घेऊन येणार आहे हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. त्यामुळे पाहायला विसरू नका डॉक्टर डॉन सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त आपल्या झी युवा वाहिनीवर.