मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री सोनम कपूर 8 मे रोजी बिझनेसमन आनंद अहुजासोबत विवाहबंधनात अडकली. अशा प्रकारे सिनेसृष्टीच्या बाहेरच्या व्यक्तीशी लग्न करणाऱ्यांच्या यादीत सोनम कपूरचा समावेश झाला आहे. आणि सोनम कपूरसाठी ही गोष्ट यासाठी खास आहे कारण सोनमचं संपूर्ण कुटुंब हे फिल्मी जगतातील मानाचं कुटुंब मानलं जातं. काही दिवसांपूर्वी अनुष्का शर्माने क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न केलं. आणि आता सोनम कपूर. सोनम कपूरच्या लग्नानंतर पुन्हा एक प्रश्न चर्चेत आला की, हाय प्रोफाइल अभिनेत्री सिने जगताबाहेरच्या व्यक्तीशी लग्न करणं का पसंद करतात?
या प्रश्नाचं उत्तर सिनेमा समीक्षक आणि सिनेमा एक्सपर्ट सुभाष झाने इंग्लिश वेबसाइटसोबत यांनी दिलं आहे. त्यांनी प्रिती झिंटा, माधुरी दीक्षित आणि असिन यांच्या लग्नाच उदाहरण देत सांगितलं की, सिनेसृष्टीतील व्यक्तीशी लग्न केलं कर सतत एकमेकांच्या कामाबद्दल किंवा फक्त सिनेमांबद्दलच चर्चा केली जाईल. त्यामुळे प्रिती झिंटाने अमेरिकेतील व्यक्तीसोबत लग्न केलं. ज्याचा सिनेमाशी काहीही संबंध नाही. त्या व्यक्तीने प्रिती झिंटाची या अगोदर कोणतीही फिल्म पाहिली नसेल. पण अशा नात्यात बॉलिवूड अभिनेत्रींच्या स्टारडमला सांभाळण कठीण होत नाही.
तसेच दुसऱ्या क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न केल्यामुळे इतर क्षेत्रातही या कलाकारांचे नाते चांगले राहते. आपण पाहिलेत अनेक सिनेसृष्टीतील लग्न जास्त काळ टिकले नाहीत. याला महत्वाच कारण असं राहिलं आहे की, त्यांच सर्कल हे एकच असल्यामुळे सारख्याच लोकांशी संबंध राहतो याचा फटका या जोड्यांना पडला आहे.