close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ऑफर मिळूनही का सिनेमे नाकारतात रणबीर - आलिया?

फिल्ममेकर या जोडीसाठी उत्सुक

Updated: Sep 21, 2019, 10:04 AM IST
ऑफर मिळूनही का सिनेमे नाकारतात रणबीर - आलिया?

मुंबई : काही महिन्यांपूर्वी फिल्मफेअर अवॉर्ड पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्टने आपल्या प्रेमाची जाहिररित्या कबुली दिली होती. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या नावाची खूप जोरदार चर्चा होती. अखेर या कबुलीनंतर सगळ्याला पूर्णविराम मिळाला आहे. पण असं असलं तरीही या दोघांच्या नावाची चर्चा काही थांबली नाही. 

आता बॉलिवूड फिल्ममेकर या रिलेशनशिपला घेऊन सिनेमा तयार करण्यास उत्सुक आहेत. अनेक फिल्ममेकर आलिया आणि रणबीर यांच्याशी सिनेमाबाबत चर्चा करत आहेत. पण आलिया-रणबीर मात्र यावर काहीच उत्तर न देताना दिसत आहेत. 

तसेच आता आलिया-रणबीर ही जोडी चर्चेत असल्यामुळे अनेक कलाकार या दोघांना एकत्र पडद्यावर दाखवू इच्छितात. पण मिळालेल्या माहितीनुसार, आलिया-रणबीर यांनी 'ब्रम्हास्त्र'च्या रिलीजपर्यंत कोणताही सिनेमा न स्विकारण्याचं ठरवलं. अयान मुखर्जीच्या 'ब्रम्हास्त्र' सिनेमातून समोर येणाऱ्या या जोडीला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय याकडे या दोघांच लक्ष आहे. 

या जोडगोळीचा हा पहिला सिनेमा असून यामध्ये अमिताभ बच्च, डिंपल कपाडिया, नागार्जून आणि मौनी रॉय अशी स्टारकास्ट आहे. हा सिनेमा डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता. पण VFX चा भरपूर वापर असल्यामुळे या सिनेमाच्या प्रदर्शनाला वेळ लागणार आहे. हा सिनेमाची प्रदर्शनाची तारिख आता 2020 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.  

तर दुसरीकरडे अनेकदा आलिया आणि रणबीर एकत्र दिसत आहेत. नुकताच आलियाची अगदी जवळची मैत्रिण आकांक्षा रंजन हिचा वाढदिवस झाला. त्या वाढदिवसाच्या बर्थ डे पार्टीला रणबीर देखील उपस्थित होता. तिथे रणबीर आलियाच्या सगळ्या मित्रांसोबत गप्पा मारताना दिसत होते.