close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

गोविंदाचा 'हा' डान्स व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ 

Updated: Sep 21, 2019, 08:58 AM IST
गोविंदाचा 'हा' डान्स व्हिडिओ व्हायरल

मुंबई : एकेकाळी आपल्या अभिनयाने आणि नृत्याने साऱ्यांनाच अभिनेता गोविंदाने वेड लावलं होतं. गोविंदाची झलक जरी दिसली तरी चेहऱ्यावर हास्य यायचं. कायम हसवणाऱ्या गोविंदाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. 

गोविंदा आणि त्याची मुलगी टीना अहुजा नुकतेच एका म्युझिक व्हिडिओत दिसले आहेत. 'इसमें तेरा घाटा' या गाण्यातून लोकप्रियता मिळालेल्या गायक गजेंद्र वर्मा यांच नवीन गाणं 'मिलो न तुम' आलं आहे. या गाण्यातून गजेंद्र यांच्यासोबत टीना दिसत आहे. 

या गाण्याची लाँच पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीतला एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये गोविंदा आपली पत्नी सुनीता अहुजासोबत नाचताना दिसत आहे. सुनीता आणि गोविंदाने आपल्या मुलीच्या गाण्यावर ठेका धरा आहे. सुनीता या गाण्यावर अशी नाचत आहे, जे पाहून डान्सचे किंग गोविंदा देखील थक्क होतात. पाहा हा व्हिडिओ 

गोविंदाचा हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. यामध्ये गोविंदाने आपल्या मुलीच्या गाण्यावर ठेका धरला आहे. पण या डान्समध्ये गोविंदाल त्याची पत्नी सुनिताने देखील चांगलीच टक्कर दिली आहे.

गोविंदा आणि सुनीताची मुलगी टीना अहुजाने या गाण्यातून डेब्यू केला आहे. टीनाच्या या व्हिडिओला खूप पसंती मिळाली आहे.